अमरावती अपर आयुक्तालयातील शिक्षण विभागाकडे विचारणा केली असता, गणवेशाची खरेदी ही टेंडर प्रक्रियेत अडकलेली असून नवीन तारीख ठरलेली नाही, असे उत्तर मिळाले. यावरून मुलांना गणवेश कधी मिळणार, याबाबत प्रशासन अनभिज्ञ…
अमरावतीत काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी मराठा आरक्षणावर ठाम भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन येणाऱ्या काळात दडपले जाईल, असा दावा केला आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील ६३ शाळांमधील पोषण आहाराचे आठमीला धान्य नमुन्यांची तपासणी सुरू आहे. दरवर्षी नमुने घेतले जातात, मात्र यंदा राज्य शासनाने अधिकृत पुणे येथील प्रयोगशाळा नियुक्त केली आहे.
शिरखेड पोलिस ठाण्याचे ठाणेदार सचिन लुले यांना धामणगाव येथे एका बंद घरात दीर्घकाळापासून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिस पथकाने वेश बदलून अवैध धंद्यांवर कारवाई केली.
थेट अमरावतीला येणे जमत नसेल तर बडनेरा येथे उतरून अमरावतीला येणेही फारसे अवघड नाही. त्यामुळे मुंबई, पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बहुतेक सर्वच सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले.
नारायण जेवडे गेल्या अनेक वर्षांपासून या चुकीच्या नोंदीसंबंधी लेहगाव ग्रामपंचायत, मोर्शी गटविकास अधिकारी आणि शिरखेड पोलिस ठाण्याच्या दरवाज्यावर आपली व्यथा मांडत होते. कोणीही त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही.
टाकीच्या भिंतीचा भाग अचानक कोसळला. यात सुमरतीचा जागीच मृत्यू झाला आणि राधिका जामुनकर, अनिशा सेलूकर, राणी धांडे या तीन मुली गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्या व्हायरल इन्फेक्शनने जिल्ह्यात कहर केला असून, डास, कीटकांपासून तसेच पाण्यापासून होणाऱ्या साथरोगांनी चांगलेच हातपाय पसरले आहेत. खासगी क्लिनिक, हॉस्पिटल्समध्ये विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली.
डोंगरांच्या कुशीतून कोसळणाऱ्या भीमकुंड धबधब्याचा शुभ्र जलप्रपात, खोल दऱ्यांमधून वर येणारे धुक्याच्या लाटा आणि पावसाच्या सरी यामुळे चिखलदऱ्याचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना वेड लावत आहे.
लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोणतंही स्थान नाही. विचार आणि मतभिन्नता असू शकते, पण ती व्यक्त करण्यासाठी किंवा विरोध दर्शवण्यासाठी हल्ल्यासारख्या कृतीचा वापर करणं हे अत्यंत निंदनीय आहे.