देहूरोड : श्रेयश जोशी या चार वर्षांच्या चिमुकल्याने अवघ्या २९ सेकंदात वेवेगळ्या नवीन चारचाकी वाहनांची २६ मॉडेल्स इंग्रजी मुळाक्षराच्या क्रमानुसार ओळखून दाखविण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे त्याची ‘इंडिया’ आणि ‘आशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. श्रेयशचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याच्या विक्रमाने रावेतच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे. असेच नवनवीन विक्रम रावेतमधील अन्य मुलानींही नोंदवावेत, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांनी केले.
‘इंडिया’ आणि ‘आशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या श्रेयस जोशी या चिमुकल्याचा भोंडवे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रावेत येथील दीपकभाऊ भोंडवे युवा मंचच्या वतीने समीर लॉन्स येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी श्रेयशचे वडील मिलिंद आणि आई रुपाली, आजी मंगल जोशी, जी. के. स्लिव्हरलॅन्ड सोसायटीचे चेअरमन धनंजय सोळुंके, ऍव्हेंचर सोसायटीचे चेअरमन विजय आचार्य, सचिव विजय माथूर, खजिनदार संदीप नाईक, निलेश जाधव, प्रसिद्ध गायक प्रणिता देशपांडे, एकनाथ देशपांडे, संतोष भोंडवे, सुनील भोंडवे, श्रीकांत नवले, वैभव देशमुख,सचिन गावडे, अभय धुमाळ, रत्नाकर करंकाळ, विठ्ठल चोपडे, विजयकुमार कर्णकोटा, अनिरुद्ध खन्नाडे, बाळू धांडे, विजय मोहरे, अशोक करमारे आदी उपस्थित होते.
श्रेयसच्या यशात आईवडिलांचे योगदान
श्रेयशने खूप कमी वयात विक्रमला गवसणी घातली आहे. त्याबद्दल त्याचे विशेष कौतूक. त्याचबरोबर या यशामध्ये त्याचे आई आणि वडील या दोघांचेही महत्वपूर्ण योगदान असल्याचे भोंडवे यांनी नमूद केले.
दीपक भोंडवेंमुळे सुखद धक्का
श्रेयसच्या विक्रमाबाबत माहिती देताना त्याची आई रुपाली म्हणाल्या, घराबाहेर पडल्यानंतर श्रेयशला दुकाने आणि सर्व प्रकारच्या वाहनांची किंवा अन्य माहिती देत गेलो. यामध्ये त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती. मात्र, तो सर्व लक्षात ठेवून सर्व नावे बरोबर सांगू लागला. त्यानंतर हळू हळू त्याचा फीडबॅक मिळू लागला. मग सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची विक्रमांकडे वाटचाल सुरु झाली आणि त्याची इंडिया आणि आशिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. श्रेयाच्या या कामगिरीचा आनंद मोठा आहे. मात्र, त्याच्या विक्रमाची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम दीपक भोंडवे यांच्यामुळे शक्य झाले. तसेच त्यांनी केलेला सन्मान आमच्यासाठी सुखद धक्का ठरल्याची भावना श्रेयसची आई रुपाली यांनी व्यक्त केली.