हार्बर मार्गावरील (Harbor railway) पनवेल रेल्वे स्थानकाजवळ (Panvel railway station) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे पनवेल स्थानकातून सीएसएमटी आणि ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळच्या वेळी लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला आहे.
सध्या रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत सुधारणा झाली आहे. तरीही हार्बर मार्गावरील गाड्या १५ ते २० मिनीट उशीरानं धावत आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी नोकरी निमित्तानं निघणाऱ्या चाकरमान्यांचं वेळापत्रक कोलमलडं असून त्यांना ऑफिसला पोहोचण्यास उशीर होत आहे.
[read_also content=”बेदरकार चालकानं चौघांना उडवलं ; दोन बँक अधिकाऱ्यांसह पादचारी जखमी, पोलिसाचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/the-careless-driver-blew-up-four-pedestrian-injured-along-with-two-bank-officers-police-died-nrps-268241.html”]