Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिकंदर शेख ठरला 2024 चा ‘रुस्तुम-ए-हिंद’; हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा कुस्तीपटू

'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा शेख हा महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Nov 06, 2024 | 02:28 PM
Wrestler Sikandar Shaikh Rustam-E-Hind Award is illegal Wrestling Federation of India warns for strict action

Wrestler Sikandar Shaikh Rustam-E-Hind Award is illegal Wrestling Federation of India warns for strict action

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्राचा नामांकित मल्ल सिकंदर शेखने देशातील मानाची स्पर्धा जिंकत ‘रुस्तुम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला आहे. अनेकवेळा त्याला यशाने हुलकावणी दिल्यानंतर त्याचे हे यश त्याच्या चाहत्यांसाठी आनंद घेऊन आले आहे. या रुस्तुम-ए-हिंद या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्यात केवळ पै. हरीशचंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद यांनीच हा किताब जिंकल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानंतर आता सिकंदर शेख हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे.

देशातील अनेक नामवंत मल्लांचा या स्पर्धेत सहभाग

पंजाबमधील जांडला जि. जालंधर येथे 2024 च्या रुस्तुम-ए-हिंद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांना धूळ चारत सिकंदर शेख याने रुस्तुम-ए-हिंद हा किताब पटकविला. या स्पर्धेत सिकंदर च्या रोशन किरलगड आणि बग्गा कोहली यांच्यासोबत झालेल्या कुस्त्या रोमहर्षक आणि पाहण्यासारख्या होत्या. अंतिम स्पर्धेत सिकंदर विरूध्द बग्गा कोहली यांच्यात कुस्ती झाली यात सिकंदर विजयी झाला. त्याला बक्षीस म्हणून मानाची गदा, ट्रॅक्टर या बक्षिसाबरोबरच आर्थिक स्वरूपातही बक्षीस मिळाले आहे.

गतवर्षी म्हणजे २०२३ ला सिकंदर शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती जिंकून ६६ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला होता. त्याच्या कुस्तीमधील पुढील करिअरसाठी पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’ने सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि सिकंदर शेख यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या मदतीच्या आधारे शेख याची विविध कुस्ती स्पर्धांत भाग घेण्याची आणि त्यात विजय मिळविण्याची घौडदौड जोमाने सुरू असून त्यात आणखी एका मोलाच्या विजयाची भर पडली आहे. या विजयाबद्दल ‘पुनीत बालन ग्रुप’कडून अभिनंदन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र केसरीचा किताब हुकला

साल 2023 साली झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिंकदर शेखवर अन्याय झाल्याचे बोलले जात होते. कोथरूड परिसरात झालेल्या ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शेवटच्या दिवशी (दि. १४ जानेवारी 2023) महाराष्ट्र केसरी गटातील अंतिम फेरीमध्ये सिंकदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. या लढतीसाठी पंच मारूती सातव हे होते. दरम्यान, यातील एका डावात पंच सातव यांनी महेंद्र गायकवाड यांना ४ गुण दिले होते.

अंतिम फेरीत य़श हुकल्यानंतर मोठा वाद
त्यानंतर, सिंकदर शेखच्या प्रशिक्षकांनी या गुणाबाबत ज्युरीकडे (थर्ड पंच) दाद मागितली. त्यात थर्ड पंच असणारे दिनेश गुंड, नवनाथ ढमाळ व अंकुश वरखडे यांनी या डावाचा व्हिडिओ पाहून सिंकदर शेख यांना एक व महेंद्र गायकवाड यांना चार गुण दिले. या कुस्तीत सिंकदर शेख यांचा पराभव झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र केसरीचा मान त्यांच्याकडून हिसकावला गेला होता. असे त्याच्या चाहत्यांचे मत होते, यावरून मोठा गदारोळसुद्धा झाला होता परंतु त्यानंतर सिंकदर शेखने आपले कौशल्य दाखवत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.

‘सिंकंदर शेख हा एक गुणवान खेळाडू आहे. त्याने रुस्तम-ए-हिंद किताब जिंकून आपल्या महाराष्ट्राचं नाव देशपातळीवर गाजवलं. भविष्यात शेख कुस्तीच्या माध्यमातून जगभरात महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव तो उंचावेल अशी खात्री आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’कडे असे गुणवंत खेळाडू आहेत, ही आमच्यासाठी आणखी आंनदाची आणि अभिमानाची बाब आहे. शेख याने मिळविलेल्या यशामुळे आणखी प्रतिभावान खेळाडूंच्या मागे उभं राहण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली.” – पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

हेही वाचा : IPL Auction : रिकाम्या 204 जागांसाठी जगभरातून 1574 खेळाडूंचे रजिस्ट्रेशन, वाचा संपूर्ण यादी

हेही वाचा : WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतासह 5 देशांमध्ये स्पर्धा! टीम इंडियाचं फायनलमध्ये जाणं झालं कठीण

Web Title: Sikandar shaikh becomes rustum e hind of 2024 fourth wrestler from maharashtra to win this title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • Maharashtra Kesari

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.