IPL लिलावात अनेक खेळाडूंची नोंदणी
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीगची (IPL) क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेळी पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी मेगा लिलाव होणार आहे, जो 4 वर्षांतून एकदा आयोजित केला जातो. BCCI ने आता IPL 2025 च्या मेगा लिलावाचे ठिकाण आणि तारखा जाहीर केल्या आहेत.
बीसीसीआयने घोषित केल्यानुसार, 24-25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी उशिरा लिलावाची माहिती जाहीर केली. बहुप्रतिक्षित कॅश रिच लीग IPL 2025 च्या खेळाडूंचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. या लिलावासाठी 1574 खेळाडूंनी नोंदणी केल्याची माहितीही बीसीसीआयने दिली आहे. (फोटो सौजन्य – X.com)
1574 खेळाडूंची नोंदणी
BCCI चे सचिव जय शाह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, IPL खेळाडूंची नोंदणी अधिकृतपणे 4 नोव्हेंबर 2024 रोजी बंद झाली आहे, एकूण 1,574 खेळाडूंनी ज्यामध्ये 1,165 भारतीय खेळाडू आणि 409 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे त्यांनी मेगा IPL 2025 खेळाडूंच्या लिलावाचा भाग होण्यासाठी अर्ज केला असून साईन अप केले आहे. हा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबिया येथे 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी दोन दिवस आयोजित करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे.
बीसीसीआयने केले जाहीर
✍️ 1574 Player Registrations
🧢 320 capped players, 1,224 uncapped players, & 30 players from Associate Nations
🎰 204 slots up for grabs
🗓️ 24th & 25th November 2024
📍 Jeddah, Saudi Arabia
Read all the details for the upcoming #TATAIPL Mega Auction 🔽🤩
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2024
हेदेखील वाचा – CSK मध्ये हा दिग्गज 10 वर्षांनंतर संघात परतणार! IPL 2025 मध्ये कहर करणार
कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडू
या यादीत 320 कॅप्ड खेळाडू आणि 1,224 अनकॅप्ड खेळाडू आहेत. तसेच असोसिएट नेशन्सच्या 30 खेळाडूंचा समावेश आहे, 48 कॅप्ड भारतीय खेळाडूंचा लिलावात समावेश केला जाईल, तर 272 कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील लिलावात उपलब्ध असतील असेही सांगण्यात आले आहे.
त्यात म्हटले आहे की, गेल्या आयपीएल हंगामाचा भाग असलेले 152 अनकॅप्ड भारतीय खेळाडू आणि गेल्या आयपीएल हंगामाचा भाग असलेले 3 अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील लिलावात समाविष्ट केले जातील. निवेदनात म्हटले आहे की 965 अनकॅप्ड भारतीय आणि 104 अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.
204 जागा रिकाम्या
IPL 2025 पूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवले होते. यानंतर एकूण 204 खेळाडूंच्या जागा रिक्त झाल्या. या 204 जागा भरण्यासाठी 24-25 नोव्हेंबर रोजी एक मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे, ज्यासाठी भारतासह जगभरातील एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यामुळे आता या लिलावात कोणाकोणाचा नंबर लागणार आहे याची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे.
IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी नोंदणी केलेले विविध देशांतील खेळाडू