mithi river bridge
मुंबई : पालिकेतील काँग्रेस, भाजप पक्षाच्या नेत्यांनी, माजी नगरसेवकांनी मुंबईतील नालेसफाईच्या कामांवरून रान उठविल्यानंतर पालिका यंत्रणा जागृत झाली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना जोमात सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईतील काही नद्या, मोठ्या नाल्यांमधील सफाई कामांना सुरुवात झाली आहे(Strict action against contractors involved in non-cleaning works; There will be live video recording of all the work).
यंदा पावसाळ्यापूर्वी २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र १६२ कोटींच्या नालेसफाईच्या कामांत कंत्राटदारांनी कामात दिरंगाई केल्यास संबंधित कंत्राटदारांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प)पी. वेलरासू यांनी दिली.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यात १० टक्के व पावसाळा संपल्यावर १५ टक्के अशा तीन टप्प्यात नालेसफाईची कामे करण्यात येतात. यंदा पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे पूर्वी नद्या, नाले यांमधून तब्बल २ लाख ५१ हजार ६१० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे
यंदा नालेसफाई कामांसाठी मोठ्या नाल्यांकरिता ७१ कोटींच्या ६ निविदा मंजूर करण्यात आल्या तर लहान नाल्यांमधील सफाई कामांसाठी ९१ कोटी रुपयांच्या ११ निविदांना मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील कामांसाठी ९ निविदा आहेत. लहान व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी एकूण १६२ कोटींची कंत्राटकामे हाती घेण्यात आली आहेत.
यामध्ये शहर विभागात ३० हजार १४२ मेट्रिक टन, पूर्व उपनगरांमध्ये ७३ हजार ४४३ मेट्रिक टन तर पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ४८ हजार २५ मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी सांगितले.
नालेसफाई कामात हात की सफाई करणाऱ्या कंत्राटदारांना वेसन घालण्यासाठी पालिकेने यंदा कडक नियमावली लागू केली आहे. नाल्याधून गाळ काढणे, तो डंपिंग ग्राउंडपर्यंत वाहून नेणे आदी कामांसाठी रिअल टाईम जिओ टॅगिंगसह फोटो, व्हिडीओ शूटिंग करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यांत आले आहे. मात्र, रिअल टाईम जिओ टॅगिंगसह फोटो, व्हिडीओ सादर न केल्यास त्या कामाची रक्कम कंत्राटदारास दिली जाणार नाही. तसेच, संबंधित दोषी कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]