Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खटल्याच्या प्रगतीचा पाक्षिक अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे एनआयए न्यायालयाला आदेश

२९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. (Malegaon bomb blas Masjid) यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 13, 2022 | 07:27 PM
खटल्याच्या प्रगतीचा पाक्षिक अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे एनआयए न्यायालयाला आदेश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : खटल्याच्या प्रगतीचा पाक्षिक अहवाल सादर करा, उच्च न्यायालयाचे एनआयए न्यायालयाला आदेश तसेच या खटल्यावरील सुनावणीदरम्यान एकापेक्षा जास्त साक्षीदारांच्या जबानी नोंदविण्यात येतील याची काळजी घ्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले. २९ सप्टेंबर २००८ मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला होता. (Malegaon bomb blas Masjid) यात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर यांना अटक करण्यात आली. (Prasad Purohit, Sadhvi Pragya Singh Thakur along with Ramesh Upadhyay, Sameer Kulkarni, Sudhakar Chaturvedi, Sudhakar Dwivedi, Ajay Rahirkar) त्यापैकी अनेकजण हे जामिनावर बाहेर आहेत. सदर खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात (Special NIA Court) सुरू आहे.

[read_also content=”डीजे, डॉल्बीवर सरसकट बंदी का? राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश https://www.navarashtra.com/maharashtra/why-a-total-ban-on-dj-dolby-court-directs-government-to-clarify-role-303930.html”]

दुसरीकडे, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए न्यायालयाने लवकरात लवकर निकाली काढावा, असे निर्देश सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिले असतानाही या खटल्यावरील सुनावणी संथगतीने सुरू असल्याचा आरोप करणारी याचिका संशयित आरोपी समीर कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यावर न्या. रेवती-मोहिते-डेरे आणि न्या. व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, एनआयएकडून खटल्याच्या सद्स्थितीची माहिती खंडपीठाला प्रतिज्ञापत्रामार्फत देण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत ४९५ साक्षीदारांपैकी २५६ जणांचा जबाब नोदवण्यात आला असून अद्यापही २१८ साक्षीदाराचे जबाब नोंदवणे बाकी आहे. तर २१ जण आतापर्यंत फितूर झाल्याचे म्हटले आहे.

त्याची दखल घेत साक्षीदार कसे तपासले जातात, दैनंदिन तपासणी कशी होते, कोण जास्त वेळ घेत आहे, खटला पुढे का ढकलला जातो, तसेच साक्षीदारांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे का?, हे तपासण्यासाठी एनआयए न्यायालयाने खटल्याच्या कार्यवाहीचा पाक्षिक अहवाल सादर करावा, असे खंडपीठाने निर्देश दिले तसेच खटल्यामध्ये दर दिवशी दोन साक्षीदारांची साक्ष नोंदविण्याचे निर्देश देत न्यायालयाने सुनावणी १ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

Web Title: Submit fortnightly report on the progress of the case the high court ordered the nia court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2022 | 07:27 PM

Topics:  

  • Sadhvi Pragya Singh Thakur

संबंधित बातम्या

Malgeaon Bomb Blast: ‘मोदी-योगींचे नाव घ्या…’ साध्वीचे खळबळजनक खुलासे; तुरुंगातील अत्याचारावर केले भाष्य
1

Malgeaon Bomb Blast: ‘मोदी-योगींचे नाव घ्या…’ साध्वीचे खळबळजनक खुलासे; तुरुंगातील अत्याचारावर केले भाष्य

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज येणार; तब्बल 17 वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा
2

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज येणार; तब्बल 17 वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.