Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुशांतच्या मृत्यूशी ड्रग्स प्रकरणाचा संबंध, एनसीबीने एनडीपीएस न्यायालयात केला ‘हा’ दावा

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakroborty) आणि तिचा भाऊ शौविक (Showik) यांनी ड्रग्स पेडलर्सकडून (Drugs) अनेकदा गांजा खरेदी करून सुशांतला दिला असल्याचे केंद्रींय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) (NCB) विशेष एनडीपीएस न्यायालयात दिलेल्या आरोपांचा मसूद्यात नमूद केले आहे.

  • By साधना
Updated On: Jul 12, 2022 | 09:31 PM
सुशांतच्या मृत्यूशी ड्रग्स प्रकरणाचा संबंध, एनसीबीने एनडीपीएस न्यायालयात केला ‘हा’ दावा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput Case) मृत्यूचा संबंध ड्रग्स प्रकरणाशी जोडलेला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakroborty) आणि तिचा भाऊ शौविक (Showik) यांनी ड्रग्स पेडलर्सकडून (Drugs) अनेकदा गांजा खरेदी करून सुशांतला दिला असल्याचे केंद्रींय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) (NCB) विशेष एनडीपीएस न्यायालयात दिलेल्या आरोपांचा मसूद्यात नमूद केले आहे.

[read_also content=”कुटुंब नियोजनात पुरुषांचे प्रमाण अत्यल्पच, जव्हार तालुक्यात महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यावर जोर https://www.navarashtra.com/maharashtra/male-ration-of-family-planning-in-jawhar-is-very-less-nrsr-303551.html”]

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिह राजपूतने १४ जून २०२० रोजी घरात आत्महत्या (Suicide) केली. सुशांतच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थांशी संबंधित बाजू समोर आली आणि एनसीबीने चित्रपट, टिव्ही वाहिन्यांशी संबंधित लोकांशी चौकशी सुरू केली. सुशांतची मैत्रीण रिया आणि तिचा भाऊ शौविकला अन्य ड्रग्स पेडलर्ससोबत अटक करण्यात आली. त्यापैकी अनेकजण सध्या जामीनावर आहेत. एनसीबीने मागील महिन्यात या प्रकरणाशी संबंधित ३५ आरोपींविरोधात विशेष एनडीपीएस न्यायालयात आरोपांचा मसुदा दाखल केला होता. तो मंगळवारी उपलब्ध करण्यात आला.

मसुद्यातील आरोपांनुसार, सर्व आरोपींनी मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीदरम्यान उच्चभ्रू समाज आणि बॉलीवूडमध्ये ड्रग्स खरेदी, विक्री आणि वितरण करण्याचा कट रचला. आरोपींनी अमली पदार्थांच्या तस्करीला वित्तपुरवठाही करून गांजा, चरस, कोकेन आणि अन्य अंमली पदार्थांचे अवैधपणे विक्री केली. म्हणूनच सर्व आरोपींवर कलम २७ आणि २७ अ(बेकायदेशीररित्या वित्तपुरवठा करणे आणि गुन्हेगारांना आश्रय देणे) २८ (गुन्हा करण्याच्या प्रयत्नांसाठी शिक्षा), २९ (गुन्हेगारी, षड्यंत्राला प्रोत्साहन देणे) यांसारख्या एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार आरोप ठेवण्यात आले आहेत. तसेच रिया चक्रवर्तीने या प्रकरणातील आरोपी आणि ड्रग्स पेडलर्स सॅम्युअल मिरांडा, शौविक, दीपेश सावंतसह अन्य पडलर्सकडून अनेकदा गांजा सुशांतला दिला आहे. शौविक आणि सुशांतच्या सांगण्यावरून तिने मार्च आणि सप्टेंबर २०२० पर्यंतचे अमली पदार्थांचे पैसेही दिले असल्याचे एनसीबीने नमूद केले आहे. रियाचा भाऊ शौविक अमली पदार्थ तस्करांच्या नियमित संपर्कात होता तो त्यांच्याकडून गांजा आणि चरसची ऑर्डर घेत असे आणि सुशांतकडे सुपूर्द करत असल्याचेही एनसीबीने आरोपींच्या मसुद्यात म्हटले आहे.

निर्माता क्षितिज प्रसादकडून दोषमुक्ततेसाठी अर्ज
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी निर्माता क्षितिज प्रसादने विशेष न्यायालयात दोषमुक्ततेसाठी अर्ज केला आहे. प्रसादला पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे. मात्र, या प्रकरणात मला नाहक ओढले असून मी अमलीपदार्थ घेत नाही. केवळ अन्य एका आरोपीच्या व्हॉट्सअँप चॅटमध्ये उल्लेख झाला म्हणून आपल्यावर कारवाई केल्याचा बचाव प्रसादने केला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर आपल्यावर करण जोहर, अर्जुन रामपाल आणि रणबीर कपूरचा उल्लेख करण्यात दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्याने केला होता. मात्र, प्रसादच्या आरोपांचे एनसीबीने खंडन केले होते. या प्रकरणी विशेष न्यायाधीश व्ही. जी रघुवंशी यांच्यासमोर २७ जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे.

Web Title: Sushant singh death case drugs case related to sushants death ncb claims yes in ndps court nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2022 | 09:31 PM

Topics:  

  • NCB

संबंधित बातम्या

सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक, कारवाई दरम्यान हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला पसार; नेमकं प्रकरण काय
1

सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक, कारवाई दरम्यान हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला पसार; नेमकं प्रकरण काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.