Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवेंद्रभाऊ सरडासुद्धा आत्महत्या करेल हो’; नवाब मलिक सत्तेत सामील झाल्यानंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला

नवाब मलिक विधानसभेत पोहोचताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिकांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं स्पष्ट झालं. यावरून विधान परिषदेत तुफान खडाजंगी झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देत, विरोधकांनाच सवाल केला. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत सुषमा अंधारे यांनी त्यांना खोचक टोला हाणला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 07, 2023 | 06:14 PM
‘देवेंद्रभाऊ सरडासुद्धा आत्महत्या करेल हो’; नवाब मलिक सत्तेत सामील झाल्यानंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला
Follow Us
Close
Follow Us:

Sushma Andhare on Devendra Fadnavis : माजी मंत्री नवाब मलिक सध्या जामिनावर सुटले आहेत. कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आज ते पहिल्यांदाच राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसले. तसंच, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. आजही ते सत्ताधारी बाकावर बसतात की विरोधकांच्या बाकावर याची चर्चा रंगली होती. नवाब मलिक विधानसभेत पोहोचताच ते सत्ताधारी बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिकांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं स्पष्ट झालं. यावरून विधान परिषदेत तुफान खडाजंगी झाली. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

नवाब मलिकांच्या या मुद्दयावरून तुफान खडाजंगी

देशद्रोही म्हणून ज्यांच्यावर टीका केली, त्यानांच तुमच्या सत्तेत सामील करून घेतलं, यावरून सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असं अंबादास दानवे आज विधान परिषदेत म्हणाले. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुरुंगात गेल्यानतंरही तुम्ही त्याचं मंत्रिपद काढायला का तयार नव्हता याचं आधी उत्तर द्या. नवाब मलिकांच्या या मुद्दयावरून तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. याचे पडसाद विधानसभेच्या बाहेरही उमटले. तर, सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी एक्सवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते

“पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपाने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्र फडणवीस भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!”, अशी खोचक टीप्पणी सुषमा अंधार यांनी एक्सवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की जेलमध्ये व्यक्ती असतानाही आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही. ते आता ही भूमिका मांडत आहेत. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आमच्या बाजूला अजित दादा मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला, भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोह्याचा आरोप झाल्यानतंर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा.

Web Title: Sushma andhare sarcasm to fadnavis in nawab malik case they said even devendrabhau sarda will commit suicide nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2023 | 06:14 PM

Topics:  

  • Deputy CM Devendra Fadnavis

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.