Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त आमदार बदलले, समस्या मात्र जैसे थे; कल्याणमध्ये नक्की चाललंय तरी काय

कल्याण पूर्वेत नागरिकांना प्राथमिक सुविधांसाठी देखील संघर्ष करावा लागत आहे, याचपार्श्वभूमीवर आमदार सुलभा गायकवाड यांनी आयुक्तांची भेट घेतली आहे. रोेजच्या समस्यांना तोंड देणाऱ्या स्थानिकांनी नाराजीचा सूर आळवला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 13, 2024 | 05:22 PM
फक्त आमदार बदलले, समस्या मात्र जैसे थे; कल्याणमध्ये नक्की चाललंय तरी काय

फक्त आमदार बदलले, समस्या मात्र जैसे थे; कल्याणमध्ये नक्की चाललंय तरी काय

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण:    कल्याण पूर्वे परिसरातील नागरिक गेले कित्य़ेक वर्षांपासून विकासापासून वंचित आहेत. याचपार्वश्वभूमीवर  मूलभूत समस्यांविषयी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. रस्ते, पाणी, मैदाने आणि रुग्णालय हे विषय लवकरात लवकर मार्गी लावले पाहिजेत अशी मागणी करण्यात आली. मात्र या पूर्वीचे आमदार गणपत गायकवाड हे देखील पंधरा वर्षापासून याच मागण्या करीत होते. आत्ता त्यांच्या पत्नी सुलभा या आमदार झाल्या आहेत. त्यामुळे कीमान आता तरी सुलभा गायकवाड यांच्या कार्यकाळात कल्याण पूर्वेतील सभोवतालच्या परिसराचा विकास पाहायला मिळावा अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.

इंदापुरात शरद पवार गट आक्रमक; ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या जोरदार घोषणा

कल्याण पूर्वेतील मतदार संघात 2009 पासून गणपत गायकवाड आमदार पदावर कार्यरत होते. त्यांनी अनेक प्रश्नांविषयी वारंवार आवाज उठवला. मात्र त्यांचे बरेच प्रयत्न अयशस्वी झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. अद्यापही कल्याण पूर्वेच्य़ा विकासकामांना गती आलेली नसून अनेक समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये विकास कामांबाबत नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. गोळीबार प्रकरणानंतर आमदार गायकवाड हे तळोजा कारागृहात आहेत. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्या पत्नीला सुलभा गायकवाड उमेदवारी जाहीर केली होती. विधानसभेच्या निवडणूकीत सुलभा गायकवाड या निवडून आल्या आहेत. मात्र आता निवडणूकीचा काळ संपला असून सरकार देखील स्थापन झाले आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी कामे करणे गरजेचे आहे. असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आहे.

Maharashtra Cabinet Expansion: ‘हा’ कट्टर शिवसैनिक कॅबिनेट मंत्री होणार? शिंदेंच्या मनातील 12 मंत्र्यांची यादी बघाच..

याचपार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे आणि महेश गायकवाड यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना भेटून कल्याण पूर्वेतील समस्यांबात चर्चा केली. समस्यांचे निराकरण करा अशी मागणी केली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर खळबळून जाग्या झालेल्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट घेतली. कल्याण पूर्वेतील रस्ते विकास, रस्ते समस्या यावर चर्चा केली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावं याविषयी आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षापासून कल्याण पूर्वेतील नागरीक प्राथमिक सुविधांबाबत समस्यांचा सामना करीत आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे निवडणूकीत या विषयी लोकांमध्ये चर्चा झाली नाही. त्यामुळे दुसऱ्याच मुद्यावरुन निवडणूक लढविली गेली. त्यामुळे या परिसारातील समस्या जैसे थे अशा स्थितीत आहेत. सुलभा गायकवाड या आमदार झाल्या आहेत. निदान आता तरी या समस्या सुटतील अशी लोकांना आपेक्षा आहे. केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांना देखील नागरीकांच्या समस्या सोडविण्याविषयी गांभीर्य दाखविले पाहिजे अशी आपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता येत्या काही काळात कल्याण पुर्वे परिसरात विकाम कामांना वेग येणार का ? तसंच परिसरातील नागरिकांचे प्रश्न सुटतील हे पाहणं आता औस्त्युक्याचं ठरणार आहे.

Web Title: Citizens in kalyan east are also struggling for basic facilities against this backdrop mla sulabha gaikwad has met the commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 05:21 PM

Topics:  

  • Sulbha gaikwad

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.