कल्याण पूर्व परिसरातील चिंचपाडा या गावातील 28 कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. तब्बल 13 वर्षानंतर इमारत अनधिकृत घोषित झाल्याने ही इमारत पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे 28कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.10वी आणि12 वीची परिक्षा सुरु होणार आहे. त्या आधी घरे खाली करण्याच्या आदेशानंतर रहिवासी हवालदिल झाले आहेत. बिल्डर आणि जागा यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादाचा फटका रहिवासियांना बसला आहे. रहिवासीयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात वक्रतुंड सोसायटी आहे. या सोसायटीत 28 कुटुंबं राहतात. 2011 मध्ये ही इमारत बांधली गेली. लोकांनी कर्ज घेऊन या इमारतीत घरे घेतली. प्रधान आवास योजनेचा फायदा देखील घर घेणाऱ्यांना झाला आहे. नंतर बिल्डर आणि जागा मालकांमध्ये वाद सुरु झाला. या इमारत प्रकरणी 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने ही इमारत अनधिकृत घोषित केल्यानंतर इमारत पाडण्याचे आदेश केडीएमसीला दिले आहे. रहिवासीयांनी उच्च न्यायालात दाद मागितली आहे. त्यावर आज सुनावणी आहे.
महापालिकेने इमारत पाडण्याचा कार्यक्रम 27 जानेवारी रोजी ठेवला आहे. रहिवासीयांनी कसे बसे पैसे जमा करुन घरे घेतली. त्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. या रहिवासियांपैकी बहुतांश रहिवासीयांची मुले 10 वीआणि 12 वीला आहेत. त्यांच्या परिक्षा तोंडावर आहे. आत्ता आम्ही जायचे कुठे. जागा मालक आणि बिल्डरचा वाद हाेता. ते आम्हाला माहिती नव्हते.आम्हाला त्याची कल्पना असती तर घरे घेतली नसती. आत्ता आम्ही जाणार कुठे घरे कुठून घेणार असा सवाल उपस्थित केला आहे. या बाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त भरत पवार यांनी सांगितले की, वक्रतुंड इमारतीचे प्रकरण 2013 सालापासून न्यायप्रविष्ट आहे.
घाटातील त्या वळणावर पुन्हा दुर्घटना! माथेरानमध्ये कारचा भीषण अपघात; कोणतीही जीवितहानी नाही
महापालिकेने ही इमारत अनधिकृत असल्याचे घोषित केले. उच्च न्यायालयाने ही इमारत दोन आठवड्यात तोडण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. त्या विरोधात रहिवासी न्यायालयात गेले आहे. त्यावर आज सुनावणी आहे. त्यावर अंतिम निर्णय आहे. निर्णय रहिवासियांच्या बाजूने लागला तर इमारत नियमित करण्याचा प्रस्ताव स्विकारला जाईल. निकाल रहिवासीयांच्या विरोधात लागला तर 27 जानेवारीला ताेडू कारवाई केली जाईल. दरम्यान या सगळ्यामुळे रहिवाश्यांची संसार उघड्यावर पडले आहेत.
.