घाटातील त्या वळणावर पुन्हा दुर्घटना! माथेरानमध्ये कारचा भीषण अपघात; कोणतीही जीवितहानी नाही
थंडीच्या दिवसात माथेरानला जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. माथेरान हिल्स स्टेशन पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि नाशिक वरुन जवळच असल्याने विकेंडला या ठिकाणी येण्यासाठी पर्यटक कायमच पसंती देतात. मात्र आता या पर्यटनाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. सकाळी दहाच्या सुमारास माथेरान घाटात एका डस्टर कार ला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या गाडीतून चार पर्यटक माथेरानला येत होते. चढणीला कार मधून धूर येऊ लागला तसे चार ही पर्यटक बाहेर पडले आणि क्षणार्धात कारने पेट घेतला. या भीषण अपघाताने परिसरात खळबळ माजली आहे. दैव बलवत्तर म्हणून आगीची तीव्रत जास्त असूनही कोणतीही जीवित हानी झाली नाही. घाटात गाडीने पेट घेतल्याने आग मोठ्या प्रमाणात लागली होती. त्यामुळे आगीमुळे कार जळून खाक झाली.
माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला घाट चढत असताना अचानक आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच चालक आणि त्याच्या सोबत असलेली महिला हे वाहनातून जीव मुठीत घेवून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झाले होते तर दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखण्यात आल्याने घाटात पर्यटकांच्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. मात्र, माथेरान नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनाला चालकच मिळत नसल्याने घटनास्थळी कार जळून पूर्णतः खाक झाली होती.
खंडाळा घाटात दुचाकी-कारमध्ये भीषण अपघात; गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
नेरळ येथून माथेरान घाट चढत असताना गारबट येथील रस्त्याच्या चढावावर अचानक कारच्या पुढील इंजिनच्या बाजूने धूर निघायला लागला असता, क्षणार्धात आगीने पेट घेतला. दरम्यान वाहन चालवणारे अॅड सोनवणे यांनी हुशारी दाखवत रस्त्याच्या कडेला कार पार्क करून दोघे बाहेर पडले. यावेळी जीव मुठीत घेवून पळणारे सोनवणे हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली, तर स्थानिक वाहन चालक नागरिकांनी यावेळी धाव घेत त्यांना बाजूला करीत त्यांचे प्राण वाचविले आहे. माथेरान नगरपालिकेची असणारी अग्निशमन वाहनास स्थानिकांनी पाचारण केले असता वाहन चालवण्यासाठी चालकच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.
उरुळी देवाची परिसरात भीषण अपघात; टँकरच्या चाकाखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू
माथेरान घाटात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या द बर्निंग कारचा थरार यामुळे तब्बल दीड तास वाहतूक सेवा बंद पडून वाहनांची कोंडी होवून बसली होती. उपस्थित नेरळ पोलिसांनी पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक रोखून ठेवल्यामुळे घाटात दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहनातून उतरून बर्निंग कारचा थरार पाहण्यासाठी रस्त्यावर एकच गर्दी केली होती. वाहनाला लागलेली आग शांत झाल्यावर पोलिसांनी येथील एकेरी वाहतूक सुरू केली. दरम्यान माथेरान अग्निशमन वाहनास चालक मिळाल्यावर दोन तासानंतर हे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती
.माथेरान घाटात आलेल्या पर्यटकांच्या वाहनाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन वाहन उपलब्ध होवू न शकल्यामुळे मोठी हानी झालेली आहे. अग्निशमन वाहनावर 24 तास सेवा देणारे चालक असतात, परंतु येथे चालक उपलब्ध नसल्याने आज ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. तर नेरळ शहरात देखील अग्निशमन वाहन असावे म्हणून यासाठी याआधी वेळोवेळी मागणी पुढे आली होती, परंतु नेरळ ग्रामपंचायत असल्याने येथे अग्निशमन वाहन कर्जत नगरपालिकेचे मागवण्यात येते त्यामुळे येथे आगीची एखादी दुर्घटना घडली तर घटनास्थळी वाहन पोहोचण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागतो त्यामुळे येणाऱ्या काळात नेरळ शहराला अग्निशमन वाहनाची आवश्यकता असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
आज नेरळ शहराला अग्निशमन वाहन असते तर घटनास्थळी हे वाहन 10 मिनिटात पोहचले असते, अशी खंत व्यक्त केली जात आहे.निसर्गरम्य ठिकाण असल्या कारणाने या ठिकाणी विकेंडला पर्यटकांची कायमच गर्दी असते. त्यामुळे बऱ्याचदा नेरळ माथेरान घाटात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अरुंद रस्ता आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे अनेकदा या ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात अपघात होत असतात.