छत्रपती संभाजी नगर: शनिवारी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक अपघाताची बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) राज्य परिवहन महामंडळाची बस वेरुळ घाटात घसरली. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. मात्र, या अपघातात बसचालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
[read_also content=”समृद्धी महामार्ग बस अपघातातील मृतांवर आज बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार, नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा https://www.navarashtra.com/maharashtra/samriddhi-highway-bus-accident-dead-mass-cremation-today-in-buldana-nrps-bus-accident-update-426170.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर इथून नंदूरबारकडे ही बस निघाली होती अशी माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाची ही आज रविवारी सकाळच्या सुमारास बस वेरुळ घाटातून जात असताना अचानक घाटात घसरली. या घटनेत सुदैवाने 24 प्रवाशी बालबाल बचावले. या सगळ्या 24 प्रवाशांना मात्र दुखापत झालेली नाही. त्यांना दुसऱ्या बसमधून चाळीसगावपर्यंत पाठवण्यात आले. मात्र या अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला आहे. राहुल चव्हाण असे या अपघातात जखमी झालेल्या बसचालकाचे नाव आहे.
खुलताबाद ते सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त डांबर वापरण्यात आले. या केमिकलमुळे महामार्ग चोपडा बनला आहे. पावसात त्यावरुन वाहने घसरत आहेत, अपघात घडत असल्याची चर्चा अपघातस्थळी ऐकावयास मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही समस्या सोडवावी अशी मागणी प्रवाशांतून, वाहनचालकांतून जोर धरत आहे.
रविवारी राज्यात भीषण अपघात झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसचा समृद्धी महामार्गावर बुलडाण्यातील पिंपळखुटाला अपघात झाला. या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. विदर्भ टॅव्हल्सची (Vidharbh Bus Accident) खासगी बस नागपूरहून पुण्याकडे (Pune) निघाली होती. या बसमध्ये दोन चालक होते. मध्यरात्री 1.30 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ बसचा भयंकर अपघात झाला. बस आधी एका खांबाला जावून आदळली आणि त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. डीझेल टाकी फुटल्याने बसने पेट घेतला, आणि क्षणात बसमधील सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला.






