Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Husain Dalwai on Nagpur Violence: नागपूरच्या हिंसाचारात पहिली चूक पोलिसांची…; हुसेन दलवाईंनी स्पष्टचं सांगितलं

मी आग लावणारा माणूस नाही, जिथे आग लागलेली असते तिथे पाण्याचा बंब घेऊन जाणारा माणूस आहे. मी तिथे जाऊन त्यांना जे झालं गेल ते विसरून जा, अशी विंनती करणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 25, 2025 | 01:51 PM
Husain Dalwai on Nagpur Violence:  नागपूरच्या हिंसाचारात पहिली चूक पोलिसांची…; हुसेन दलवाईंनी स्पष्टचं सांगितलं
Follow Us
Close
Follow Us:

 मुंबई: ”जेथे दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होते, तेथे मी स्वतः भेट देतो. अशा ठिकाणी जाऊन दोन्ही समाजांमध्ये सलोखा आणि भाईचारा प्रस्थापित व्हावा, शांतता राखली जावी, यासाठी मी प्रयत्न करतो.सत्यशोधन समिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्थापन केली होती. नागपूरमध्ये गेल्यानंतर मी सामाजिक संस्था, एनजीओ, स्थानिक नागरिक आणि पत्रकारांची भेट घेतली. सध्या तेथे शांतता प्रस्थापित झाल्याची माहिती मिळाली आहे.” अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हुसेन दलवाई म्हणाले, ‘दंगलीला कारणीभूत ठरलेली हिरवी चादर जाळण्याची घटना अत्यंत संवेदनशील आहे. अशा प्रकारच्या आंदोलनांमध्ये पोलीस सहसा हस्तक्षेप करतात आणि कोणत्याही वस्तू जाळण्यास परवानगी दिली जात नाही. मग या ठिकाणी चादर जाळण्यास कशी परवानगी देण्यात आली? ही पहिली चूक पोलिसांची चूक आहे. मुस्लिम समाजानेही महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने उत्तर द्यायला हवे होते. महाराष्ट्रात याआधी कधीही असे विघटनकारी वातावरण नव्हते. येथे नेहमीच एकोपा आणि सामाजिक सलोखा राहिला आहे. हिंदू-मुस्लिम समाज परस्परांच्या सणांमध्ये सहभागी होतात. गुढीपाडवा आणि रामनवमी यांसारखे सणही शांततेत साजरे होतील, यावर माझा विश्वास आहे.

Kunal Kamra : ‘…तरच माफी मागणार’, राडा, तोडफोडीनंतर कुणाल कामरा थेट बोलला

गावातील मंदिरे किंवा मशिदी कोणत्याही एका धर्माची नसतात, ती संपूर्ण गावाची असतात. मात्र, सरकार काही विशिष्ट गटांना जाणीवपूर्वक मदत करत असल्याचे जाणवते, आणि मला वाटते की हे चुकीचे आहे.सकाळी आंदोलन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही, मात्र रात्री आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय, काही घरांची तोडफोड करण्यात आली, पण त्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर प्रक्रियेचे पालन झाले नाही. महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा प्रदेश आहे, आणि येथे जातीवादाचा नाही, तर एकोप्याचा वारसा आहे.   असही त्यांनी यावेळी सांगितलं.

मी आग लावणारा माणूस नाही, जिथे आग लागलेली असते तिथे पाण्याचा बंब घेऊन जाणारा माणूस आहे. मी तिथे जाऊन त्यांना जे झालं गेल ते विसरून जा, अशी विंनती करणार आहे.  युपीच्या द्वेषाच्या राजकारणाप्रमाणे महाराष्ट्रातही असे द्वेषाचे राजकारण करू नये,  युपीप्रमाणे आपल्या इथे बुलडोझर कारवाईला माझा विरोध आहे. पण जर अशी कारवाई करायचीच  असेल तर जर सुप्रीम कोर्टाने तशी नोटीस दिली असेल तरच तशी कारवाई व्हावी. पण ती विशिष्ट समाजापुरती आणि विशिष्ट लोकांपुरतीच मर्यादित असू नये. मी मुंबईचा आहे. मुंबईत 20 टक्के अनधिकृत बांधकामे आहेत. तिथे तुम्ही बुडजोझर कारवाई करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Maharashtra Politics : विधानसभा उपाध्यक्षपदासाठी ‘या’ तीन नेत्यांची नावं चर्चेत; अण्णा बनसोडे यांचं नाव आघाडीवर…

गुन्हेगारांना व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असेल तर ते धोकादायक आहे. आताचं सरकार गुन्हेगारांसाठी पायघड्या आंथरत असेल तर ते गंभीर आहे. परभणीत सुर्यवंशीची हत्या झाली. धक्कादायक म्हणजे पोलीस चौकीत त्याला मारलं गेलं. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही. मी तिथेही जाणार आहे. एका मुलाला पोलीसच मारतात हे गंभीर आहे.  असंही त्यांनी सांगितलं

Web Title: The first mistake in the nagpur violence was the police hussain dalwai clearly stated nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • Nagpur Violence

संबंधित बातम्या

Nagpur Riots News: नागपूर दंगल, भाजप कार्यकर्त्यांचा रोष अन् नागपूरमध्ये पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली
1

Nagpur Riots News: नागपूर दंगल, भाजप कार्यकर्त्यांचा रोष अन् नागपूरमध्ये पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

Nagpur Violence: पोलिसांशी वाद, हल्ल्याच्या ठिकाणी हालचाली…; नागपूर हिंसाचारातील तिसऱ्या आरोपीला अटक
2

Nagpur Violence: पोलिसांशी वाद, हल्ल्याच्या ठिकाणी हालचाली…; नागपूर हिंसाचारातील तिसऱ्या आरोपीला अटक

Nagpur Violence: ‘दोन समाजात तेढ…’; सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी दिली सक्त ताकीद
3

Nagpur Violence: ‘दोन समाजात तेढ…’; सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी दिली सक्त ताकीद

Nagpur Violence : ‘पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?’; जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
4

Nagpur Violence : ‘पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?’; जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.