औरंगाबाद : रिक्षाचालकांच महिला प्रवाशांसोबत होणार गैरवर्तणुक ही काही नवी बाब नाही. रिक्षाचालकानं महिलेची छेड काढल्याची घटना ऐकण्यात येतात. असाच काहीसा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला. रिक्षाने एकटीने घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची रिक्षाचालकाने छेड काढल्याने तीने घाबरुन धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
[read_also content=”विकृतीची सीमा गाठली! बिहार मधील घटना; 13 वर्षीय मुलीवर सामूहित बलात्कार; स्पन, गुप्तांग आणि जीभ कापली https://www.navarashtra.com/crime/limits-of-distortion-reached-events-in-bihar-13-year-old-girl-gang-raped-spun-genitals-and-tongue-cut-nrrd-345243.html”][blurb content=””]
औरंगाबाद शहरातील सिल्लेखाना चौकात ही भरदुपारी ही घटना घडली आहे. एकटी अल्पवयीन मुलगी शिकवणीहून घरी रिक्षाने जात असताना चालकाने तिला ‘फिरायला आवडेल का? असे म्हणून अश्लील बोलत विनयभंग केला. यावेळी घाबरलेल्या मुलीने स्वतःला रिक्षाचालकाच्या तावडीतून वाचविण्यासाठी अक्षरक्षः धावत्या रिक्षातून उडी मारत स्व:तचा जीव वाचवला. रिक्षातून उडी मारल्याने मुलगी जखमी झाली आहे. परिसरातील लोकांनी तिला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यात तिच्या डोक्याला मार लागला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची छेड काढणाऱया रिक्षाचालकाला पकडण्यात यश आले आहे. मात्र, या प्रकारामुळे रिक्षाचालकांचे महिला प्रवाशांसोबत होणारं गैरवर्तन आणि महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
[read_also content=”ओला इलेक्ट्रिक स्कूटर घोटाळ्याचा मोठा खूलासा; देशभरात अनेकांची याप्रकरणी फसवणूक https://www.navarashtra.com/automobile/ola-electric-scooter-scam-big-reveal-many-people-have-been-cheated-in-this-matter-across-the-country-nrrd-345231.html”]