मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची लवकरच निवड होणार असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. याबाबत त्यांनी आपलं मतही मांडलं आहे. अध्यक्ष निवडीवर जास्त चर्चा करण्याची गरज नसून राज्यपालांनी सुद्धा निवड करण्याबाबत आम्हाला पत्र पाठवलं आहे. निवडीबाबत आम्ही नियमात बदल केले मात्र ते चुकीचे नाही ज्या पद्धतीने लोकसभा राज्यसभेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होते तश्या पद्धतीने निवड केली जाणार आहे. राज्यपाल याला नियमांना पाठींबा देतील अस मला वाटत लवकरच आम्ही वरिष्ठ नेतृत्वाला नाव देणार असून ते अंतिम निर्णय घेतील असे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
तरपुढे त्यांनी ईडीवरही निशाना साधला आहे. ‘आता लहान मुलांना ही ईडी समजायला लागली असुन केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर आता राजकारणा साठी केला जातोय. आता नेत्यांच्या बायका पोरा पर्यँत या यंत्रणा जात असतील तर हे निषेधार्थ आहे. जर यात चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जात असेल तर तो सहन होत नाही. राजकारणात तत्वासाठी भांडण ठीक आहे मात्र व्यक्ती द्वेष नसावा. आजच्या राजकीय परिस्थितीला दोषी आम्ही नसून भाजप आहे.’ असे बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे बोलताना स्पष्ट केले आहे.