Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य परिवहनच्या ताफ्यात तब्बल दीडशे बसेसचा तुटवडा; प्रवाशांची होतीये मोठी गैरसोय

शासनाने एसटी बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यासह अन्य अनेक प्रवासी सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविल्या जात आहेत. परिणामी, एसटी बसकडे प्रवाशांचा ओढाही वाढला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 08, 2024 | 03:11 PM
राज्य परिवहनच्या ताफ्यात तब्बल दीडशे बसेसचा तुटवडा; प्रवाशांची होतीये मोठी गैरसोय

राज्य परिवहनच्या ताफ्यात तब्बल दीडशे बसेसचा तुटवडा; प्रवाशांची होतीये मोठी गैरसोय

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : एकीकडे एसटीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक गाड्‌या दाखल होत आहेत; पण सर्वसामान्य प्रवाशांची गरज लक्षात घेता 2019 मध्ये 465 बसगाड्या होत्या. त्या तुलनेत अमरावती विभागाला 145 गाड्यांची कमतरता असल्याने एसटी प्रशासनाला नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे कमी एसटी बसमुळे मात्र प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

हेदेखील वाचा : मंत्रिपदासाठी इच्छुकांचा मुंबई मुक्काम लांबला; यवतमाळचे सातही आमदार अधिवेशनासाठी मुंबईत

अमरावती विभागात राज्य परिवहन महामंडळाचे अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड आणि चांदूर रेल्वे असे आठ आगार आहेत. या आगारांमध्ये 2019 मध्ये 465 एसटी बसगाड्या होत्या. एप्रिल 2023 मध्ये बसची संख्या 365 वर आली. यामधील तब्बल 100 गाड्यांचे आयुर्मान संपल्याने टप्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात आले. अशातच एप्रिल 2024 मध्ये या एसटी बसची संख्या 326 वर आली आहे.

येत्या मार्च महिन्यापर्यंत एसटी महामंडळाच्या 326 बस गाड्यांपैकी 45 गाड्यांचे आयुर्मान संपल्याने टप्प्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी अमरावती विभागात एसटीच्या ताफ्यात सुमारे 465 एसटी बस होत्या. ती संख्या मार्च महिन्यापर्यंत तरी यापैकी 281 वर येणार आहे. अशातच मागील काही दिवसांपासून बसमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे.

नवीन बसेसची प्रतीक्षा

शासनाने एसटी बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यासह अन्य अनेक प्रवासी सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविल्या जात आहेत. परिणामी, एसटी बसकडे प्रवाशांचा ओढाही वाढला आहे. विशेष म्हणजे, एसटी बसचा तुटवडा असल्याने पैसे देऊन रस्त्यावर ताटकळण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे.

एसटी गाड्यांची तोकडी संख्या

एसटी गाड्यांची तोकडी संख्या हे महत्त्वाचे कारण आहे. प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच अमरावती विभागाला नव्या गाड्या कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.

महामंडळाकडून तिकिटात सवलत असल्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांची एसटी बसेसना गर्दी होते. महिलांसोबत लहान मुलेदेखील एसटीतून प्रवास करतात. एसटी बसेसची संख्या कमी असल्याने दाटीवाटीने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना प्रवास करावा लागत आहे. गाड्यांची संख्या वाढली नसल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे.

गाड्या बिघाडीचे प्रमाण वाढले

एसटी बसमध्ये इंजिन बिघाड, नादुरुस्त, ट्रान्समिशन फेल, एक्सेल तुटणे, सस्पेन्शन आदी समस्या उद्भवत आहेत. याशिवाय खराब रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे गाड्यांना नियोजित वेळेत पोहोचता येत नाही.

हेदेखील वाचा : ‘भारत सोडा, अमेरिकाही नाही टिकणार, 4 दिवसांत कोलकाता काबीज करू’ ; बांगलादेशचे रिटायर्ड मेजरचे वक्तव्य

Web Title: There is a shortage of about 150 buses in the state transport nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • Maharashtra ST

संबंधित बातम्या

‘लालपरी’तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश
1

‘लालपरी’तून प्रवास आता होणार सुकर; एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.