मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी आमदारकीचा राजीनामा (Resigns) दिला की नाही ते माहित नाही. आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही हे पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईल. त्यानंतर पोलीस योग्य निर्णय घेतील. पण, त्यांच्यावर कारवाई करण्यामागे पोलिसांवर कोणताही राजकीय दबाब नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले (Chief Minister Eknath Shinde clarified that there is no political pressure on the police).
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हाड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
[read_also content=”भारतीय रेसिंग लीगसाठी नवा राजमार्ग तयार करण्यासाठी एक्झॉनमोबिलची रेसिंग प्रमोशन्सबरोबर भागीदारी https://www.navarashtra.com/business/exxonmobil-partners-with-racing-promotions-to-create-a-new-highway-for-the-indian-racing-league-nrvb-344732.html”]
कोण कुठल्या पक्षात आहे म्हणून त्यांच्यावर राजकीय भावनेने कारवाई करणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, आमचे राज्य हे कायद्याचे राज्य आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे ठीक आहे. पण, कुणी कायदा हातात घेतला तर ते खपवून घेतले जाणार नाही.
आव्हाड यांच्याविरोधात जी तक्रार दाखल झाली त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस योग्य पद्धतीने तपास करतील त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. ते नियमाप्रमाणे जी काही तक्रार आहे त्याची चौकशी करतील. तसेच, पोलीस तपासामध्ये पारदर्शकता असेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.