Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरटीआय कार्यकर्ते बोराडे यांच्यावर हल्ला करणारे तिघे अटकेत; एक फरार

घोडेगाव येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार लक्ष्मण बोराडे यांच्यावर १० मार्च रोजी झालेल्या खुनी हल्ला प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. बार व्यवसाय बंद व्हावा तसेच इमारतींच्या नोंदी होऊ नयेत म्हणून नंदकुमार बोराडे (वय ४६, रा. घोडेगांव) यांनी ठिकठिकाणी अर्ज केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 29, 2022 | 06:34 PM
आरटीआय कार्यकर्ते बोराडे यांच्यावर हल्ला करणारे तिघे अटकेत; एक फरार
Follow Us
Follow Us:

घोडेगाव : घोडेगाव येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार लक्ष्मण बोराडे यांच्यावर १० मार्च रोजी झालेल्या खुनी हल्ला प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. बार व्यवसाय बंद व्हावा तसेच इमारतींच्या नोंदी होऊ नयेत म्हणून नंदकुमार बोराडे (वय ४६, रा. घोडेगांव) यांनी ठिकठिकाणी अर्ज केले होते. याचा राग मनात धरून जितेंद्र प्रभाकर काळे (वय ४०, रा.घोडेगाव) याने सुपारी देऊन हा हल्ला योगेश पवार (रा.विक्रोळी वय-४०), जाफर शमीम अहमद (रा.मुंब्रा वय २४), शबाझ मेनन (रा. मुंबई वय २८) यांच्यामार्फत घडवून आणला.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी दरेकरवाडी गावाच्या हद्दीत रात्री सव्वा अकराच्या सुमारास आंबेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या संरक्षित भिंती लगत नंदकुमार बोऱ्हाडे उभे असताना दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी धारदार हत्याराने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात नंदकुमार बोराडे यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली. दोन अनोळखी इसमांनी हल्ला केल्याचा गुन्हा घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. चार आरोपी पकडण्यात यश आले असून, एक आरोपी अद्याप फरार असून लवकरच जेरबंद केले जाईल, अशी माहिती घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तेव्हापासून घोडेगाव पोलीस ठाण्याचे जीवन माने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या तपासाच्या मागावर होते. या तपासात कोणतेही सबळ पुरावे मिळत नव्हते, सीसीटीव्ही फुटेज व्यवस्थित समजत नव्हते, अंधार असल्याने नंदकुमार बोराडे यांनादेखील हल्ला केलेल्या हल्लेखोरांचे चेहरे नीट दिसले नाहीत. संशयित अनेक असल्याने नेमके हे कृत्य कोणी केले याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. अनेक संशयितांवर पोलिसांनी पाळत ठेवून लक्ष ठेवले. अनेक संशयितांना बोलवून उलट तपासणी केली, तासन् तास बसून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले.

या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेष घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले, किशोर वागज, अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, संदीप लांडे, जालिंदर रहाणे, संदिर रसाळ, नामदेव ढेंगळे, मनिशा तुरे, संगिता मधे, तसेच स्थानिक अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस अंमलदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, अतुल डेरे, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर यांनी तपास केला.

Web Title: Three arrested for attacking rti activist nandkumar borade one accused fugitive nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2022 | 06:34 PM

Topics:  

  • RTI Activist

संबंधित बातम्या

‘5 जुलैपासून आमरण उपोषण करणार’; RTI नियमांवर अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला इशारा, फुटीर खासदारांवरही टीका
1

‘5 जुलैपासून आमरण उपोषण करणार’; RTI नियमांवर अण्णा हजारेंचा फडणवीस सरकारला इशारा, फुटीर खासदारांवरही टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.