सप्त योगातली आजची अक्षय तृतीया, 900 वर्षांनंतर आलीय ही पर्वणी, आज सोनं आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक लाभदायक
सोनं हे अक्षय मानलं जातं, म्हणून आजच्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. वेदांत सोन्याला दैवी आणि सर्वात पवित्र धातू संबोधलेले आहे. सोनं खरेदी केल्यानं कुटुंबांत समृद्धी येते असं सांगण्यात येतं. यंदा अक्षयतृतियेला सोन्याच्या किमतीही वाढलेल्या आहेत.
मुंबई- अक्षय तृतीया (Akshay Tritiya) या शुभारंगाचा सण आहे. साडे तीन मुहुर्तांपेकी एक असलेल्या या सणाला विशेष म्हत्त्व आहे. विदर्भ, खान्देश आणि वऱ्हाडात हा सण विशेष उत्साहात साजरा करण्यात येतो. शुभ कार्य करण्यासाठी, सोनं, घर खेरीदासाठी आजचा दिवस हा शुभ मानण्यात येतो. या दिवशी पंचांगांत मुहुर्त न पाहता चांगली कार्ये करता येतात. कैरीचा डाळ, अंब्याचा रस अशी मेजवानी आजच्या निमित्तानं घरोघरी होते. आजच्या दिवशी गरजूंना दान केल्यानं मोठं पुण्य पदरी पडतं असंही सांगण्यात येतं.
या दिवसी सूर्य, चंद्र या राशीही उच्च असतील, तर शुक्र आणि शनि हे स्वताच्या राशीत असतात. मेष राशीत चतुग्रही योग तयार होतायेत. त्यासह केदार, शंख, पर्वत, समुख, आयुष्यमान, महादान आणि ध्वज असे सात शुभ योगही तयार होतात. गेल्या 900 वर्षांत अशी पर्वणी आलेली नाही. या दिनी सुरु केलेलं कोणतंही कार्य हे अक्षय्य आणि प्रगतीचं ठरणार आहे.
आज का करतात सोन्याची खरेदी
सोनं हे अक्षय मानलं जातं, म्हणून आजच्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. वेदांत सोन्याला दैवी आणि सर्वात पवित्र धातू संबोधलेले आहे. सोनं खरेदी केल्यानं कुटुंबांत समृद्धी येते असं सांगण्यात येतं. यंदा अक्षयतृतियेला सोन्याच्या किमतीही वाढलेल्या आहेत.
सोन्यासह आज घरं, वास्तू, जमीन, वाहनांची खरेदी करण्यात येते. नोकरी व्यवसायातही सुरुवात करणाऱ्यांसाठी हा दिवेश विशएष महत्त्वाचा मानण्यात येतो.
कन्या दान
हा शुभमुहुर्त असल्यामुळं लग्नासाठी मुहुर्त पाहण्याची आवश्यकता आजच्या दिवशी नसते. आजच्या दिवशी करण्यात आलेल्या कन्या दानाला विशेष महत्त्व असल्याचं सांगण्यात येतं.