Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले २६ विद्यार्थ्यांचे प्राण; मद्यधुंद बसचालकाला घेतले ताब्यात

एक खाजगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती. या खाजगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवित असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्याने पोलिसाने त्याला रोखले. बसचा चालक मद्यधुंद असल्याने बस ताब्यात घेतल्याने विद्यार्थ्यांचे प्राण वाचले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 20, 2024 | 10:52 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

कुर्ला येथे मद्यधुंद चालकाने बस चालविल्याने झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमावावे लागले. ही घटना ताजी असताना उल्हासनगरातून विरारला एक खाजगी बस विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती. या खाजगी बसचा चालक बस वेडीवाकडी चालवित असल्याचे पोलिसाच्या लक्षात आल्याने पोलिसाने त्याला रोखले. बसचा चालक मद्यधुंद असल्याने त्यांच्या ताब्यातील बस पोलिसांनी जप्त केली. मद्यधुंद बस चालकाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेमुळे २६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहे. वाहतूक पोलिसांनी बजावलेल्या कर्तव्य दक्षतेचे शहरात कौतूक केले जात आहे.

आज सायंकाळी एका खाजगी बस उल्हासनगर येथील जग्गू फुटबॉल अकॅडमीतील २६ लहान मुलांना घेऊन विरारला जाण्यासाठी निघाली होती. बसमधील लहान मुले विरारच्या ग्लोबल स्कूल येथे फुटबॉल खेळण्यासाठी जाणार होती. उल्हासनगरातून निघालेली ही बस वालधूनी पूल उतरून कल्याणच्या सुभाष चौकात आली. बस चालक बस वेडीवाकडी चालवित होता. ही बाब सुभाष चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणारे वाहतूक पोलिस सुरेश पाटील यांच्या निदर्शनास आली. तात्काळ पोलिस पाटील यांनी बसच्या चालकाला हात दाखवून ती जागीच थांबविण्यास सांगितले. बस चालकाने बस थांबविली. तेव्हा पोलिस पाटील हे बस चालकाजवळ केले. बस चालकाने मद्यसेवन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बस चालक सुरेंद्र प्रसाद गाैतम यांची ब्रेथ अ’नालायझर टेस्ट केली. त्यातही तो मद्य प्राशन केल्याचे उघड झाले. ही बाब अतिशय गंभीर असल्याने पोलिस पाटील यांनी बस चालकाच्या ताब्यातील बस जप्त केली. बस चालकास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी बस चालकाला उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याने दंड भरला तर त्याच्या ताब्यातील बस सोडण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेश शीरसाट यांनी दिली आहे. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पीएमपीएलमध्ये गर्दीत छेड काढणाऱ्या दारुड्याला महिलेने दिला चोप, व्हिडिओ व्हायरल

पीएमपीएल बसने प्रवास करणाऱ्या महिलेचा रुद्रावतार पाहिला मिळाला अन् सर्वांच्या भुवया देखील उंचावल्या, पण तिच्या या रूद्रावताराचा सर्वांनी कौतुक देखील केले. बसमधील गर्दीत छेड काढणार्‍या दारूड्याला या रणरागिनेने धडा शिकवला. त्याला चोप देत पोलिसांकडे दिले. तत्पुर्वी या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. भरदुपारी स्वारगेट ते वाकडेवाडी या बसमध्ये बाजीराव रस्त्यावर ही घटना घडली.

पीएमपीएलच्या बसमध्ये दारूड्या व्यक्तीने महिलेची छेड काढली. नंतर मात्र, या रणरागिणिचा रूद्रावतार सर्वांना पाहिला मिळाला. तिने या मद्यपीला चांगलाच चोप दिला. त्याचा व्हिडीओ देखील काहींनी काढला. सध्या तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांनीही तिची पाठराखण करत कौतुक केले आहे.

Web Title: Traffic polices vigilance saved the lives of 26 students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 09:58 PM

Topics:  

  • Ulhasnagar

संबंधित बातम्या

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड
1

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar Crime: कविता शिकवताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेची चिमुकल्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2

Ulhasnagar Crime: कविता शिकवताना टाळ्या न वाजवल्याने शिक्षिकेची चिमुकल्याला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड
3

Ulhasnagar : उल्हासनगरात नशेखोरांचा थैमान, अनेक वाहनांची तोडफोड

Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
4

Thane News : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर ! मंडप शुल्काबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.