PCMC News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागातील तीन अधिकारी, अभियांत्रिकी विभागातील एका महिला अधिकाऱ्याची बदली तर दोन अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती झाली आहे. पीएमआरडीएत महसूल विभागासह शासनाच्या विविध विभागांतून अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. या अधिकार्यांची नियुक्ती जमीन व मालमत्ता, अतिक्रमण निर्मूलन, विकास व परवानगी विभागांमध्ये करण्यात आलेली असते. या यंत्रणेत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी यांचा समावेश असतो.
अतिक्रमण निर्मूलन विभागातील उपायुक्त (उपजिल्हाधिकारी) प्रमोद कुदळे यांची बदली कोरेगाव, सातारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून झाली आहे. तसेच, या विभागातील तहसीलदार सचिन म्हस्के यांची प्रतिनियुक्ती समाप्त करून त्यांची महाबळेश्वर, सातारा येथे नेमणूक करण्यात आली आहे.
Pune Crime News :’या दिवशी तुझा मृत्यू होणार!’, भोंदूबाबा गुंगीचे औषध देऊन भक्तांसोबत करायचा अश्लील
अभियांत्रिकी विभागातील उपअभियंता शीतल देशपांडे यांची बदली ग्रामविकास विभाग, पुणे येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी स्नेहल अंबू यांनी पदभार स्वीकारला आहे.
पीएमआरडीएमध्ये नुकतीच सेवानिवृत्ती पत्करलेले अधिकारी म्हणजे काही महिन्यांपूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी पदावरून सहआयुक्तपदी रुजू झालेले संजय गायकवाड तसेच अभियांत्रिकी विभागातील एक वरिष्ठ अभियंता यांचा समावेश आहे.
Navi Mumbai Crime : ‘जरा बाळाला पकडाल का?’ अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला लोकलमध्ये सोडून
विकास परवानगी विभागात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. जवळपास १६ सहायक महानगर नियोजनकार यांचे विभाग बदलेले असून त्यात गुंठेवारी प्रकरणे, नऊ विविध तालुके, टीडीआर प्रकरणे, वृक्ष प्राधिकरण, मूल्यांकन प्रकरणे, वास्तुविशारद, आकाशचिन्ह आदी विभागांतील कामकाजाचा समावेश आहे. यामुळे संबंधित विभागांमध्ये नव्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती लागू होणार आहेत. या बदल्यांमुळे पीएमआरडीएमधील विविध विभागांचे कार्य अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.