मुख्यमंत्री तसेच पीएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा विकास आराखडा (डीपी) रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अधिकृत अधिसूचना शनिवारी जाहीर करण्यात आली.
बारामती शहराचा पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) लवकरच समावेश होणार असून या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
अभियांत्रिकी विभागातील उपअभियंता शीतल देशपांडे यांची बदली ग्रामविकास विभाग, पुणे येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी स्नेहल अंबू यांनी पदभार स्वीकारला आहे.
पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांचा निधी एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी दिला होता. याही वर्षी सर्व मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी देखील या वेळेस सगळ्या दिंड्यांची यादी बनवली आहे.