'एकीच्याही केसाला धक्का लागला तर..' ; उद्धव ठाकरेंनी थेट कोल्हापूरच्या 'मुन्ना'ला भरला दम
उद्धव ठाकरे यांची आज श्रीगोंदा येथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. तर महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केलेले कोल्हापूरचे भाजपचे नेते धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना थेट इशारा दिला आहे. कोल्हापूरच्या त्या मुन्नाला माझं चॅलेज आहे, मी स्वत: आमच्या सभेला आलेल्या महिलाचे फोटो काढून पाठवतो, मात्र एकाही महिलेच्या केसालाही धक्का लागला तर तेच हात जाग्यावर राहणार नाहीत, असा दम ठाकरेंनी दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कोल्हारच्या मुन्नाचं नाव ऐकला असेल. धनंजय महाडिक भाजपचे कोल्हापूरचे नेते. त्यांनी महाविकास आघाडीच्या सभानां जाणाऱ्या महिलांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो, असं वक्तव्य केलं होतं. त्याला जाऊन सांगा, माझ्या सभेला आलेल्या माता भगिनींचे फोटो काढून पाठवतो. खरं तर महिलांचे असे फोटो काढणे गुन्हा आहे. मात्र कोल्हापूरच्या मुन्ना सांगा, मी फोटो पाठवतो. मात्र जर यातील एका जरी माता भगिनीच्या केसाला जरी धक्का लागला, तर तुमचे हात जाग्यावर ठेवणार नाही, याला धमकी म्हणा नाहीतर आणखी काही, असा दम ठाकरेंनी दिला आहे.
लाडकी बहीण योजनेतून १५०० रुपये हे देत आहेत. तेही निट देत नाहीत, आम्ही ३००० रुपये देणार आहोत. मात्र भाजपच्या नेत्यांचीही असली कसली मस्ती. कुठून आली. या माता बहिणींना हे आपल्या नोकर समजतात का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. यांचेच वरिष्ठ नेते असे असतील तर काय करणार. कर्नाटकातील प्रज्वल रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांवर लैगिंक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. मात्र नरेंद्र मोदी त्यांचे हात बळकट करायला सांगत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीसंदर्भातील बातमम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कोल्हापुरातील महायुतीच्या सभेत भाजप नेते धनंजय महाडिक यांनी, ज्या महिला कॉंग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी किंवा सभांना जातील त्यांचे फोटो काढून माझ्याकडे पाठवा, त्यांची व्यवस्था करतो. पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि प्रचाराला त्यांच्या जायचं असं विधान केलं होतं. त्यानंतर राज्यातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या विधानानंतर त्यांनी माफी मागितली होती. निवडणूक आयोगानेही त्यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकातील निजदचे नेचे प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर अनेक महिलांंनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. तक्रारी आल्यानंतर प्रज्ज्व रेवण्णा फरार झाले होते. कर्नाटकात निजदने भाजपशी युती केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपवर देशभरातून टीका झाली होती. विरोधकांनीही निवडणुकीत हा मुद्दा लावून धरला होता.