कल्याण : सर्व सुविधा मिळणार म्हणून ग्रामस्थांनी एक वर्षाकरीता भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड सुरु करण्याची परवानगी दिली. मात्र सुविधा काही मिळाल्या नाही. या डंपिंग ग्राऊंडचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कचऱ्याची समस्या ते सोडवू शकत नाही. त्यांची नाचक्की होऊ नये याकरीता शुक्रवारपर्यंतची मुदत प्रशासनाला दिली आहे. हा डंपिंग ग्राऊंड आम्ही बंद करणार असा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिला आहे.
डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय असताना
शुक्रवारी मनसे आमदार पाटील यांच्या उपस्थितीत डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय घेतला होता प्रसासनाच्या आग्रहापोटी आत्ता शुक्रवारपर्यंची मुदत देण्यात आली आहे. कल्याण ग्रामीणमधील भंडार्ली गावात ठाणे महापालिकेने डोंगराच्या पायथ्याशी डंपिग ग्राऊंड सुरु केले होते. हे डंपिंग ग्राऊंड एक वर्षापूर्वी सुरु करण्यात आले होते. या डंपिंग ग्राऊंडमुळे भंडार्ली गावासह पिंपरी, मोकाशी पाडा या ठिकाणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी
डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या दुर्गंंधीमुळे नागरिक हैराण झाले आहे. या ठिकाणच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्दी खोकला, तापाचे आजार होऊ लागले आहे. डोंगर पायथ्याला असलेल्या डंपिंगचे पाणी नागरिकांच्या शेतीत शिरले आहे. त्यामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीसह त्या ठिकाणी असलेल्या तबेला व्यावसायिकांचा दूधाचा धंदा अडचणीत आला आहे. या सगळ्या कारणांनी त्रस्त असलेल्या नागरीकांनी काल आमदार राजू पाटील यांच्या उपस्थित डंपिंगवर टाकणाऱ्यात येणारा कचरा बंद केला.
डंपिंग त्वरीत बंद करण्याकरिता आमदार पाटील आग्रही
हे डंपिंग त्वरीत बंद करण्यात यावे, या मागणीसाठी आमदार पाटील हे आग्रही आहे. काम बंद पाडल्याने आज ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमवेत आमदार पाटील यांच्यासह त्रस्त नागरिकांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांसह त्रस्त नागरिकांना ठाणे महापालिका प्रशासनाला शुक्रवारपर्यंतचा अल्टीमेट दिली आहे.
ठाणे महापालिका आयुक्तांनी मागितला वेळ
याबाबत ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे की या संदर्भात आपल्या स्तरावर मुख्यमंत्र्यांची चर्चा करून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल मात्र दोन महिन्याची वेळ देण्यात यावी