मुंबई : शहरी नक्षलवादप्रकरणी (Urban Naxalism Case) अटकेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते (Human rights activists) गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांना नवी मुंबईतील घरात (Navi Mumbai, Home) नजरकैदेत ठेवण्याची मागणी केली आहे (It has been demanded to be kept under house arrest). त्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे या विशेष न्यायालयात बुधवारी उपस्थित नवलखा यांच्या हमीदार म्हणून उपस्थित राहिल्या. न्यायालयानेही त्यांना नवलखा यांची हमीदार म्हणून मान्यता दिली. परंतु, सुरक्षेचे कारण पुढे करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी नवलखांच्या घरावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे हमीदार उपस्थित राहूनही नवलखा यांची कारागृहातील सुटका लांबणीवर पडली आहे.
मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यांची मागणी १० नोव्हेंबर रोजी मान्य करताना नवलखा यांना महिन्याभरासाठी नजरकैदेत ठेवण्याचे आणि याबाबतच्या आदेशाची ४८ तासांत अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. हमीदार प्रमाणपत्राची गरज नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
त्यानंतर बुधवारी विशेष न्यायालयात न्यायाधीश राजेश कटारिया यांच्यासमोर ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे या नवलखा यांच्या हमीदार म्हणून उपस्थित झाल्या. त्यामुळे नवलखा यांची कारागृहातून सुटका होऊन त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्याची अपेक्षा होती. मात्र, एनआयएने नवी मुंबईतील जागेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि न्यायालयानेही त्याची दखल घेतल्याने नवलखा यांची कारागृहातील सुटका लांबणीवर पडली आहे.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन लेखक आणि पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सचे माजी सचिव, गौतम नवलखांसह इतर काही जणांविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला. त्यांनतर नवलखांना २८ ऑगस्ट २०१८ रोजी अटक करण्यात आली होती.