Wai News: वाईच्या उत्कर्ष पतसंस्थेचा राज्यस्तरीय गौरव! 'नवराष्ट्र सहकार भूषण पुरस्कार 2026'ने सन्मानित

वाई येथील उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेला दैनिक ‘नवराष्ट्र’च्या वतीने प्रतिष्ठेचा ‘सहकार भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या ‘नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
Wai News
Wai News (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  1. उत्कर्ष पतसंस्थेला ‘सहकार भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

  2. मुंबईतील ‘नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड्स’मध्ये गौरव

  3. पारदर्शक कारभार आणि सभासदांच्या विश्वासाची पावती

सहकार क्षेत्रात चांगली वाटचाल करणाऱ्या उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई या संस्थेला नवभारत वृत्तसमूहाच्या दैनिक 'नवराष्ट्र' कडून प्रतिष्ठेचा 'सहकार भूषण पुरस्कार 2026' मिळाला आहे.मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवार, दि. 25 नोव्हेंबर 2026 रोजी झालेल्या 'नवराष्ट्र को-ऑपरेटिव्ह अवॉर्ड्स 2026' या खास सन्मान सोहळ्यात संस्थेला या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

• मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील तसेच ओम शुगर्सचे ओम बोत्रे पाटील या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेच्या वतीने संचालक अमर आनंद कोल्हापुरे यांच्या सोबत संस्थेचे एच.आर. ओमकार अमरेंद्र वनारसे व अधिकारी सागर दीपक धोंगडी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी दैनिक 'नवराष्ट्र' चे वरिष्ठ महाव्यवस्थापक राजेश वरळेकर व संपादक संजय मलमे हे व्यासपीठावर उपस्थित होते. या दिमाखदार सन्मान सोहळ्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सहकारी बँका व पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, अधिकारी तसेच सहकार क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते.

• सभासदांचा विश्वास हेच यशाचं गमक

सभासदांचा विश्वास, स्वच्छ कारभार, आर्थिक शिस्त, चांगली ग्राहक सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत उत्कर्ष पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. संस्थेच्या सततच्या प्रगतीची आणि चांगल्या कामाची दखल घेणारा हा पुरस्कार संस्थेच्या गौरवशाली वाटचालीची मोठी पावती आहे.

हा पुरस्कार म्हणजे संस्थेच्या यशस्वी वाटचालीतला आणखी एक सोनेरी क्षण असून, संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित मेहनतीचा गौरव आहे. या सन्मानामुळे उत्कर्ष पतसंस्थेसह पूर्ण वाईच्या सहकार क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.