Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीतून ‘वंचित’ जवळजवळ बाहेर; संजय राऊतांचे स्पष्ट संकेत; प्रकाश आंबेडकर BRS सोबत थाटणार संसार

Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीसोबत असलेल्या घटक पक्ष 'वंचित'बरोबरची चर्चा फिसकटल्यात जमा झाली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊतांनी याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांची BRS सोबत बोलणी सुरू असल्याचे माहिती सूत्रांमार्फत कळाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख भूतकाळात केला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.

  • By युवराज भगत
Updated On: Mar 21, 2024 | 03:09 PM
Vanchit almost out of Mahavikas Aghadi, Sanjay Raut's clear signal, Prakash Ambedkar to join BRS

Vanchit almost out of Mahavikas Aghadi, Sanjay Raut's clear signal, Prakash Ambedkar to join BRS

Follow Us
Follow Us:

Maha Vikas Aghadi Seat Sharing : मुंबई : वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) चर्चा फिसकटल्यातच जमा आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. याचं कारण म्हणजे, आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज वंचितचा उल्लेख भूतकाळात केला. हे लक्षात आल्यावर संजय राऊतांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बातमी त्यांच्या तोंडून निघून गेली होती.

चार जागांचा प्रस्ताव

आम्ही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्,र त्यांची भूमिका वेगळी आहे, अशा शब्दांत राऊतांनी मविआ आणि वंचितमधील मतमतांराची कल्पना दिली. त्यामुळे वंचितसोबतची महायुतीची चर्चा फिस्कटल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख भूतकाळात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख भूतकाळात केला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब आंबेडकर हे सन्मान नेते आहे. त्यांची अनेक वेळा आमची चर्चा झाली, त्यांनी चार जागेवरती लढावं, त्यांना आम्ही सूचना केल्या आहेत, हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता, तर आम्हाला आनंद झाला असता.”

बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा

“या हुकूमशाहीच्या लढायला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळाल असतं. आम्हाला अजून देखील खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. तुमच्या मनात काही नाराजी असेल ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल. वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे.”, असं संजय राऊत म्हणाले.

बीआरएस आणि वंचित लोकसभेसाठी गाठ बांधणार?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा ‘अॅक्शन मोड’वर आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेले आहेत.

प्रकाश आंबेडकर आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा

महाविकास आघाडीशी सुरू असलेली बोलणी जवळपास फिसकटल्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता अन्य पर्याय शोधण्यास सुरूवात केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि बीआरएस पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यात फोनवरून चर्चा झालीये. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बीआरएस वंचितसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचं कळतंय. मराठवाड्यातील बीआरएसचे नेते कदीर मौलाना यांनी आंबेडकरांची अकोल्यात भेट घेतली. कदीर यांच्यामार्फत केसीआर यांनी आंबेडकरांसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी आंबेडकरांना दोन मोठ्या शासकीय कार्यक्रमांना देखील निमंत्रित केलं होतं.

Web Title: Vanchit almost out of mahavikas aghadi sanjay rauts clear signal prakash ambedkar to join brs nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2024 | 03:07 PM

Topics:  

  • Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.