rain
मुंबई : या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस पडला असून, नदी नाले, धरणातील साठा जवळपास शंभर टक्के भरला आहे. दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी मागील आठवड्यात मुंबईसह कोकण तसेच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy rains in Mumbai) पडलाय. मागील आठवड्यात कोकणसह मुंबईला ऑरेज अलर्ट (Orange Alert) हवामान खात्याने (weather department) दिला होता. दरम्यान, पुन्हा एकदा हवामान विभागाने विदर्भात (vidharbha) यलो अलर्ट (yellow alert) दिला आहे.
[read_also content=”आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा, आदित्य ठाकरेंना भाजपाचे आव्हान https://www.navarashtra.com/maharashtra/before-you-first-show-vedanta-project-land-keshav-upadhyay-question-to-aditya-thackeray-328965.html”]
दरम्यान, विदर्भात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईसह ठाण्यात तसेच कोकणातही मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. यावर्षी मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.