महाराष्ट्र युवक काँग्रेसचा वाद थेट दिल्लीदरबारी;
राज्यात विधानसभेचा प्रचार जोरात सुरू असून विदर्भातही राजकारण तापलं आहे. दरम्यान कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार याच्या प्रचारासाठी त्यांची कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील आकापूर गावात सभा घेतली, मात्र गेल्या तीन दिवसांपासून या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईल टॉर्चमध्ये सभा घ्यावी लागल्यामुळे संतापलेल्या शिवानी वडेट्टीवार यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लाखोली वाहिली.
चंद्रपूर : तीन दिवसापासून वीज खंडित असलेल्या सावली तालुक्यातील आकापूर गावात युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार प्रचारासाठी गेल्या. तेथे त्यांनी मोबाईल टॉर्चमध्ये सभा घेतली. निवडून आल्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांना दाखवते असा दम देखील त्यांनी सभेत दिला.
( Viral Video ) pic.twitter.com/wHans0PRM5
— Amit Joshi (@amitjoshitrek) November 11, 2024
हेही वाचा-Pune Politics: नो वॉटर नो वोट..; पुणेकरांचा स्वत:चा जाहीरनामा, या मुद्द्यांची मागणी
राज्यात सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सातत्यांने खंडित होत असतो. काही वेळा तर दोन-तीन दिवस वीज नसते. आता ऐन निवडणुकीतही सावली तालुक्यातील आकापूर गावात गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यातच शिवानी वडेट्टीवार यांची या यावात काल रात्री सभा झाली. मात्र गावात अंधार असल्यामुळे त्यांना मोबाईलच्या टॉर्चमध्ये सभा घ्यावी लागली. त्यामुळे सभेत त्यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. निवडून आल्यानंतर या सर्वांना दाखवते असा दम देखील दिला.
हेही वाचा-“एकनाथ शिंदे गद्दारी करून मुख्यमंत्री झाले”; सुषमा अंधारे यांची घणाघाती टीका
तुमच्या जीवनात अंधार पेरण्याचं काम भाजप करत आहे आणि विकास कोणाचा होत आहे तर गुजरातचा, तुमच्या गावचा नाही. उद्या विजय वडेट्टीवार यांना मोठ्या पदावर जाऊ द्या, मग या सर्वांना इंगा दाखवू. ते विरोधी पक्ष नेते आहेत. ते उद्याचे मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांना विजयी करा, असं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं. यावेळी त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिव्याही हासडल्या. दरम्यान त्यांची ही शिवराळ भाषा टीकेचा विषय ठरली आहे. यावेळी ग्रामस्थांनी देखील शिवानी वडेट्टीवार यांच्याकडे महावितरण कंपनीच्या विरोधात लेखी निवेदन व तक्रारी दिल्या आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात शिवानी वडेट्टीवार यांना मोबाईलच्या टॉर्च लावून सभा घ्यावी लागली. मोबाईलच्या प्रकाशात ग्रामस्थांची सभा घ्यावी लागली. त्यामुळे त्या चांगल्याच संतापलेल्या पहायला मिळाल्या. दरम्यान त्यांच्या या शिवराळ भाषेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय सध्या विदर्भात हा चर्चेचा विषय बनला असून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.