Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू

राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात आणि या निवडणुकांसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते.

  • By Aparna
Updated On: Sep 27, 2022 | 05:49 PM
पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरू
Follow Us
Follow Us:

सोलापूर : राज्याच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात आणि या निवडणुकांसाठी पात्र उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. 2023 मध्ये नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर, कोकण या विभागांसाठी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पुर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त करून तीन वर्षे झालेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्र. 18 भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांत उपलब्ध आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर

या दुव्यावर उपलब्ध आहे.

अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 रोजीच्या लगतच्या सहा वर्षातील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्र. 19 भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांत उपलब्ध आहे. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर या दुव्यावर उपलब्ध आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. राजकीय पक्ष, मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी किंवा रहिवाशी कल्यणकारी संस्थांकडून एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्धी केली जाईल. या यादीसंबंधी दावे व हरकती घेण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 हा आहे. तर 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील आणि अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल

Web Title: Voter registration for graduate and teacher election begins nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2022 | 05:49 PM

Topics:  

  • Election
  • graduate

संबंधित बातम्या

PoK protests: सर्वत्र फक्त मृतदेह…! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार
1

PoK protests: सर्वत्र फक्त मृतदेह…! पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तपात उसळला; निवडणुकीत उघडपणे गैरप्रकार

Bombay High Court : धर्माच्या नावावर मतांची मागणी नाही; ‘दुआ’ आणि ‘आमीन’ संदर्भात बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
2

Bombay High Court : धर्माच्या नावावर मतांची मागणी नाही; ‘दुआ’ आणि ‘आमीन’ संदर्भात बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.