Truck driver embezzles Rs 26 lakh worth of foreign liquor, pretends to be an accident
कारंजा : नाशिक येथून ८० लाखांची विदेशी दारू घेऊन येणारा ट्रक नागपूर ला जात असतांना चालकाने ट्रकातील २६ लाखाची दारूची परस्पर विक्री केली. तर, या अफरातफरी विरुद्ध कारंजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी चालक सुरेश घुले (३७) यांचा शोध पोलिस घेत आहेत. तो नाशिक येथील रहिवासी आहे.
[read_also content=”जातीचे खोटे प्रमाणपत्र लावून ११ उमेदवारांनी मिळवली महाबीजमध्ये नोकरी, अधिकारी व कर्मचा-यांवर बरखास्तीची कारवाई https://www.navarashtra.com/akola/vidarbha/akola/11-candidates-get-jobs-in-mahabeej-by-forging-caste-certificates-nraa-250128.html”]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथून नागपूरकडे दारू भरलेला ट्रक क्र महा. २२ एन २५५५ हा अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सावळी (खुर्द) शिवारात चालकाने रस्त्याच्या कडेला ट्रक नाल्यात घुसवला. त्यानंतर ट्रक सोडून चालक पसार झाला आहे. या ट्रकमध्ये विदेशी दारू असल्याने रात्रीच पोलिसांनी गस्त वाढवली होती. या ट्रकातील ४०० विदेशी दारूचे बॉक्स गायब होते. अपघातग्रस्त झाल्याने प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक येथून एक हजार विदेशी दारूची बॉक्स भरुन नागपूर येथे गोडाऊनला आणण्यात येत होते. या दरम्यान, चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक नाल्यात घुसवला आणि अपघात घडल्याचा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहनातील ४०० विदेशी दारूचे बॉक्स ट्रकमध्ये नसल्याने फिर्यादी राकेश गुजर यांनी कारंजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत २६ लाखाची दारूची परस्पर अफरातफर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
[read_also content=”बारावीच्या विद्यार्थिनीची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या, का उचलले असेल गीताने असे टोकाचे पाऊल ? https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/twelfth-grade-student-commits-suicide-by-spraying-pesticides-why-did-geeta-take-such-an-extreme-step-nraa-250242.html”]
या प्रकरणात ट्रक चालक सुरेश सरंधर घुले वय (३७) यांच्या नावाने तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी चालक सुरेश घुले यांचा शोध कारंजा पोलिस घेत आहे. ट्रकमधील दारूची अफरातफर करण्यात आली. त्यात ट्रकचा अपघात घडवण्याचा प्रयत्न चालकाने केला असावा. घटनास्थळी दारू चोरी गेली नसून नाशिकवरुन येताना दारूची चालकाने विल्हेवाट लावून ट्रकचा अपघात घडवण्याचा प्रयत्न केला. तर, पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन मानकर व प्रदीप कुंभरे तपास करीत आहे.