
मुंबई : मुंबईकरांची (Mumbai) तहान भागवण्यासाठी प्रत्यक्षात ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा (Water Supply) मुंबईला होत असल्याचा दावा मुंबई पालिका जल विभागाकडून(Water Department) करण्यात येतो. मात्र पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २५ ते ३० टक्के म्हणजेच सुमारे साडेआठशे ते ९०० दशलक्ष लिटर पाणी चोरी व गळतीमुळे वाया जाते. त्यामुळे प्रत्यक्षात मुंबईची तहान भागवण्यासाठी फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पालिकेच्या नव्या धोरणामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईची तहान भागवण्यासाठी अतिरिक्त साठा वापरण्याची वेळ महापालिकेवर येत असतानाच दुसरीकडे पाणी माफियांचे चांगभलं सुरू आहे. मुंबईत काही ठिकाणी खासगी टँकर माफिया, तसेच झोपदीदादा अनधिकृत नळजोडणी करून पाणी चोरी करीत असल्याची माहिती अनेकवेळा समोर आली आहे. पाणी गळती, पाणी चोरीमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात असताना हे रोखण्यासाठी आतापर्यंत पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. यावरून पालिका सभागृहात अनेकवेळा वादही रंगले आहेत. पाणी हक्क समितीने याविरोधात सातत्याने आवाज उठवून प्रशासनाचे लक्षही वेधले आहे. मुंबईतल्या डोंगरावरील भागात पाणी टंचाई असताना पाणी चोरीचे प्रमाण अद्याप थांबलेले नाही.
[blockquote content=”मागेल त्याला पाणी, या धोरणाचे आम्ही स्वागत करतो. गेल्या २८ नोव्हेंबर २०१६ रोजी या धोरणाची अंमलबजावणी झाली. मात्र त्यात त्रूटी होत्या. लोकांना पाणी मिळू नये यासाठी जलअभियंते प्रयत्न करीत होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही प्रशासनाला मदत करू. मात्र अडथळे निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करायला हवी. ” pic=”” name=”-सीताराम शेलार, समन्वयक, पाणी हक्क समिती”]
स्वच्छ व शुद्ध पाणी मिळणे हा मुंबईकरांचा अधिकार असला तरीही आजही मुंबईतील एम वॉर्डमधील ५० टक्के कुटुंबं चक्क दररोज पाणी विकत घेतात. पाण्यावर होणारा खर्च हा जवळपास अन्नधान्यांवर होणाऱ्या खर्चाइतकाच आहे. साडेसहा ते दहा हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक उत्पन्न असलेल्या या कुटुंबांच्या मिळकतीमधला मोठा हिस्सा हा पाणी विकत घेण्यावर खर्च होतो. असे गोवंडी –शिवाजी नगर, मानखुर्द मधील रहिवाशांनी सांगितले.
सामान्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन टँकर माफिया पाणी विकतात. ज्यांच्याकडे नळ आहेत त्यामध्येही कमी दाबाने पाणी येते, या नळातूनही चोरून दुसऱ्या जोडण्या दिल्या जातात. पालिका नव्या जोडण्या देत नसल्याने सामान्यांपुढे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो, हेच येथील विदारक चित्र आहे.
[read_also content=”‘रनवे 34’ चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज, वाढली प्रेक्षकांची उत्सुकता https://www.navarashtra.com/photos/runway-34-movie-second-trailer-released-nrsr-267611.html”]
एकीकडे पाणी माफिया तर दुसरीकडे पाणी गळतीचे प्रमाणही मोठे आहे. दीड कोटी मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो, असा दावा जल विभागाकडून करण्यात येतो. मात्र पाणी चोरी व गळतीमुळे दिवसाला २५ ते ३० टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईला दिवसाला फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होतो. पाणी चोरी व गळती रोखण्यात जल विभाग अपयशी पडत असून वेळेत पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे या गोष्टी सर्रास सुरु असतात. त्यामुळे मुंबईत पाणी चोरी व गळती रोखण्यासाठी प्रशासन वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च करते, तरीही हे प्रमाण थांबलेले नाही.
मागेल त्याला पाणी तेही शुद्ध मिळेल. तसेच झोपडीधारकांना नळजोडणी, ओसी नसलेल्या रहिवाशांनाही समान दराने पाणी मिळणार असून येत्या १ मे पासून नवीन धोरणाची अंमल बजावणी होणार असल्याचे उपनगराचे पालक मंत्री आदित्य़ ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षाची सतावणारी ही समस्या आता दूर होणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
येथे होते सर्वाधिक पाणी चोरी
यामध्ये महापालिकेच्या टँकरची संख्या सुमारे ९ हजार १८१ आहे, तर खासगी टँकरची संख्या सुमारे ३९ हजार ९९९ एवढी आहे. काही खासगी टँकरद्वारे पाण्याची लूट केली जाते.