मारेकऱ्यांच्या मोबाईलमध्ये सापडला झिशान यांचा फोटो
मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी अचानक गोळीबार केला. याप्रकरणाच्या तपासात आता मोठी अपडेट आली आहे. सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांच्या मोबाईलमध्ये झिशान यांचा फोटो सापडल्याचे सांगण्यात आले आहे.
बाबा सिद्दीकी यांची झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणाच्या एका आठवड्यानंतर मुंबई पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये सिद्दीकी यांचा मुलगा झिशान यांचा फोटो आढळून आला आहे. या प्रकरणातील सूत्रधाराने झिशानचा फोटो शूटर्ससोबत शेअर करण्यासाठी स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲप्लिकेशनचा वापर केल्याचेही समोर आले आहे. या शूटर्स आणि कटकारस्थानांनी संवाद साधण्यासाठी या ॲप्लिकेशनचा वापर केला.
झिशान सिद्दीकीच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन शूटर्सपैकी गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांना अटक करण्यात आली आहे, तर शिवकुमार गौतम सध्या फरार आहे. चौथा संशयित हरीशकुमार बालकराम निसाद याला सोमवारी उत्तर प्रदेशातून अटक करून काल मुंबईत आणण्यात आले.
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना
झिशान सिद्दिकी आमदार असणाऱ्या भागात त्यांच्या वडिलांवर अर्थात बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अजूनही कोणतेही कारण कळले नसून हा हल्ला लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याची माहिती समोर आली आहे. सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ ही घटना घडली असल्याचे समोर आले. निर्मल नगर भागामध्ये फटाक्यांची आतिषबाजी सुरू असतानाच संधी साधत बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती आता मिळाली आहे.