
मुंंबई: गेल्या काही दिवसांपासून नेत्यांकडून सुरू असलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ज्येष्ठ अभिनेते राहूल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांच्यापासून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे विरोधी महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. हे सर्व सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या रोखठोक सदरातून ‘भाजप परिवारातील या गुन्हेगारांना कोण वाचवत आहे?’ असा सवाल करत सत्ताधारी भाजपवर टिकेचा आसूड ओढण्यात आला आहे.
वाचा काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी हे मुंबईत येऊन जोरात म्हणाले, “मुंबईची भाषा मराठी नाही.” यावर राज्य सरकार थातूरमातूर उत्तरे देऊन गप्प बसले. मराठीचा अपमान आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आपल्याच घरातले आहेत. अबू आझमींवर कारवाई झाली, पण भाजप परिवारातील या गुन्हेगारांना कोण वाचवत आहे?
Aurangzeb Tomb: औरंगजेबाचे थडगे हटवणार…! फडणवीसांच्या मनात नेमकं चाललंय काय?
भारतीय जनता पक्षाचे व खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते भैयाजी जोशी यांनी महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई शहरात येऊन एक धक्कादायक विधान केले. त्यांनी सांगितले, “मुंबईची भाषा मराठी नाही. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे असे नाही.” श्री. जोशी यांनी पुढे जाऊन असे जाहीर केले की, “मुंबईतील घाटकोपरसारख्या भागाची भाषा ही गुजरातीच आहे.” मुंबईत येऊन केलेल्या या विधानाने महाराष्ट्राचे मन दुखावले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजीराजांची ही मराठी भाषा. याच भाषेतून महाराष्ट्र निर्मिती झाली. त्या महाराष्ट्रासाठी ज्या 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्या हुतात्म्यांची भाषा ही मराठी, पण भैयाजी जोशींसारखे ज्येष्ठ नेते “मराठी कशाला?” हा प्रश्न मुंबईत येऊन विचारतात व महाराष्ट्र थंड राहतो.
Jagdeep Dhankhar Health News: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावली; एम्समध्ये उपचार सुरू
सरकार पक्षाचे लोक जोशी यांच्या विधानाचे समर्थन करतात. मराठीसाठी लढा देणारे मुंबईत अनेक जण. एखाद्या सामान्य अमराठी दुकानदाराने मराठी भाषेचा अपमान केला तर हे मराठीवादी त्या दुकानदाराच्या कानाखाली आवाज काढतात व त्याचा गाजावाजा करून प्रसिद्धी मिळवतात, पण भैयाजींसारखा संघाचा ज्येष्ठ नेता मराठीबाबत गंभीर विधान करतो तेव्हा हे सर्व पक्ष आणि कार्यकर्ते शांत बसतात.
राजकारणासाठी नेत्यांना छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी हवे असतात. त्यांना औरंगजेबही लागतो, पण छत्रपतींची मराठीबाबतची भूमिका त्यांना मान्य नाही. हिंदवी स्वराज्य झाल्यावर भाषेचा प्रश्न आला. स्वराज्याची भाषा कोणती? फारसी की मराठी? छत्रपतींनी त्यासाठी अभ्यास समिती नेमली नाही.