Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ते पैसे वाटल्याचा आरोप; कोण आहेत विनोद तावडे, ज्यांनी फडणवीसांचं टेन्शन वाढवलंय?

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी एक दिवस मुंबईत मोठा राडा पहायला मिळाला. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या विनोद तावडेंवर विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 19, 2024 | 06:54 PM
भाजप नेते विनोद तावडेंना मिळणार 'ही' मोठी जबाबदारी

भाजप नेते विनोद तावडेंना मिळणार 'ही' मोठी जबाबदारी

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी एक दिवस मुंबईत मोठा राडा पहायला मिळाला. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या विनोद तावडेंवर विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मतदानाआधी घडलेल्या या प्रकारामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेले विनोद तावडे यांची अचानक राज्याच्या राजकारणात पु्न्हा एन्ट्री का झाली?  देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाला त्यांच्यापासून धोका आहे का? कशी आहे विनोद तावडे यांची राजकीय कारकीर्द आणि पक्षातील स्थान, जाणून घेऊया एका रिपोर्टमधून..

विद्यार्थी कार्यकर्ता ते राष्ट्रीय सरचिटणीस

राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास चार दशकाहून सक्रिय असलेल्या विनोद तावडे यांचा जन्म 20 जुलै 1963 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविप या भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नते प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्या तालमीत ते वाढले. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) 1980 मध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1988 मध्ये ते ABVP चे सरचिटणीस बनले. याकाळात त्यांचा अनेक विद्यार्थी आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग होता.

1994 मध्ये पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता

विनोद तावडे 1994 मध्ये भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले आणि वर्षभरातच त्यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. १९९९ मध्ये चार वर्षांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष बनले. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी कमी वया विराजमान होणारे ते पहिले नेते ठरले होते. जवळपास ९ वर्षांनी २००८ मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार बनले. तर २०११ मध्ये विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते झाले.

मोदी लाटेत विधानसभेत संधी, मात्र..

२०१४ मध्ये केंद्रात भाजपची एक हाती सत्ता आली. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत विनोद तावडे यांना भाजपने बोरिवली विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आणि त्यांनी विधानसभेत पाहिल्यांदा प्रवेश केला. मंत्रिमंडळात त्यांना शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण ही खाती सोपावण्यात आली. 2019 मध्ये मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे तावडेंचं राजकीय करिअर पणाला लागलं होतं. पण पक्षाने त्यांना 2020 मध्ये त्यांना राष्ट्रीय सचिव पद दिलं आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी सरचिटणीसपदी वर्णी लागली. त्यानंतर हरियाणाचे प्रभारी, बिहारसारखं महत्त्वाचं राज्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबादारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांचा दबदबा वाढला.

कधी सुरू झाला तावडे-फडणवीस संघर्ष

महाराष्ट्रात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्यात भाजपचा प्रमुख चेहरा बनले होते. त्यात विनोद तावडे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ नेते शिवाय राजकीय जडणघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झालेली. भाजपच्या जुन्या फळीतले किंवा जुन्या नेत्यांच्या तालमीत वाढलेले. त्यामुळे दोघांमधला संघर्ष फार काळ लपून राहिला नाही. २०१९ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी कधीही उघड नाराजी व्यक्त केली नाही. राज्यात पुन्हा कुठेही अंतर्गत गटबाजी किंवा हालचाली न करता त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन केला.

राजकीय महत्त्वाकांक्षा

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विनोद तावडे यांनी उघडपणे गृहमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र त्यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे ते नाराज असल्याची त्यावेळी चर्चा होती. मात्र २०१९ पर्यंत येता येता त्यांच्याकडील इतर खातीही कमी घेण्यात आली होती. तावडेंकडे असलेलं वैद्यकीय शिक्षणमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील गिरीश महाजन यांना देण्यात आलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि तावडे यांच्यात संघर्ष सुरू असल्याचंही बोललं जात होतं. २०१९ मध्ये ज्यावेळी तिकीट कापण्यात आलं, त्यामागे देवेंद्र फडणवीस याचा हात असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर ते दिल्लीत राष्ट्रीय राजकाणात व्यस्त होते.

मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान विनोद तावडे यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. त्यानंतर गेल्या महिनाभरात ते प्रचार आणि काही माध्यमांमध्येही पक्षाची भूमिका मांडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला महाराष्ट्रात महायुतीला मोठं अपयश आलं. त्यांचं खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्यात येत होतं. शिवाय मराठा आंदोलनामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचला होता. त्याच दरम्यान विनोद तावडे यांचं नाव राज्यात चर्चेत येत राहिलं. त्यामुळे जर महायुतीचं सरकार राज्यात आलं तर देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आता राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे आणि त्यानंतर २३ रोजी निकाल. त्यामुळे राज्यात कोणाची सत्ता येणार आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार की विनोद तावडे यांना, हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Who is vinod tawde who increase devendra fadnavis tension on bjp cm candidate race maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 06:17 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Vinod Tawde

संबंधित बातम्या

BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?
1

BJP President: राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये हालचालींना वेग; महाराष्ट्रातील ‘हे’ नाव आघाडीवर, RSS ची भूमिका काय?

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
2

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.