मुंबई: विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.अशातच महाराष्ट्राच्या पोलीस विभागातून महत्त्वाची घडामोड घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली. रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतरव विवेक फणसाळकर यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त असलेले विवेक फणसाळकर यांच्याकडे सध्या राज्य पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून गंभीर आरोप होत होते. फोन टॅपिंग प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. ठाकरे गटाचे खासदार आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही रश्मी शुक्ला यांच्याविरोधात टीका करत त्यांच्या बदलची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील निवडणूक आयोगाकडे रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती. तर, रश्मी शुक्ला यांना हटवल्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी नाना पटोलेंनी पुरावे सादर करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा: दिवाळी पार्टीच्या ट्रेंड मध्ये सईच्या दिवाळी पहाटच होतंय कौतुक, मित्र मैत्रिणीच्या सोबतीने दिवाळी
रश्मी शुक्ला यांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. विवेक फणसाळकर हे मुळचे पुण्याचे आहेत. विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याआधी ते महाराष्ट्र पोलीस गृहनिर्णा आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते. 2016-17 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे ते प्रमुख होते.
विवेक फणसाळकर यांची कारकीर्दीच्या सुरूवातीलाच अकोला येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. त्यानंतर वर्धा आणि परभणी जिल्ह्यांमध्येही त्यांनी अधिक्षकपद भूषवले होते. नाशिक पोलीस आयुक्तालयात त्यांनी उपायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. विवेक फणसाळरांना मुंबई आणि मुंबई पोलीस दलाची चांगली माहिती आहे. त्यांनी मुंबई पोलीस दलातील प्रशासन विभाग आणि मुंबईतील वाहतूक विभागात कार्यरत असताना त्यांनी वाहतूक कोंडीची समस्या हाताळण्यासाठी महत्त्वाचे योगदानही दिले होते. विवेक फणसाळकर हे शांत स्वभावाचे असून शिस्तप्रिय आणि इंग्रजीवर प्रभुत्व ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत.
हेही वाचा: ‘येथे’ कबरीवर लावण्यात आल्या मोठ्या घंटा; यामागचे कारण जाणून बसेल आश्चर्याचा धक्का