• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Who Will Be The New Millionaire On Sony Marathi Starting From 6th June Nrdm

सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचा ६ जूनपासून प्रारंभ

सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 27, 2022 | 09:00 PM
सोनी मराठीवर कोण होणार करोडपतीच्या नव्या पर्वाचा ६ जूनपासून प्रारंभ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम येत्या ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. कोण होणार करोडपती या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षी देखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत. ‘आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असे या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य असून यानिमित्ताने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळेस सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी , क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित फाळके, ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि अष्टपैलू कलाकार अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित होते .

कोण होणार करोडपती’ ह्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक येत असतात. आणि सचिन खेडेकर येणाऱ्या प्रत्येकाशी ते खूप आपलेपणाने बोलत असल्याने स्पर्धकांना ते लगेच आपलेसे वाटतात. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मानसिक धीर देणं हे काम ते मोठ्या खुबीने करतात. त्याचबरोबर स्पर्धकांना बोलतं करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास त्यांची खूप छान मदत होते. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातील खूप मोठं नाव असल्याने ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात.

सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तर त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ,खेड्यापाड्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होत असतात. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीनी स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत. या वेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे.

कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून ६ लाखांपेक्षा अधिक फोन नोंदणी करता आले. या वेळी प्रेक्षकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच त्यांचं दर्जेदार मनोरंजन करण्याचाही कार्यक्रमाचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर यंदाही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट ‘कोण होणार करोडपती’मध्ये होणार आहे. या पर्वात निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात १८ वर्षांची एक तरुण मुलगी आणि ७० वर्षांची एक व्यक्ती देखील सहभागी झाली आहे. आणि इतर सहभागी स्पर्धकांमध्ये डॉक्टर , पोलीस उपनिरीक्षक ,महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन , एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर , फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनौन्सरदेखील अशी विविध क्षेत्रांमधील स्पर्धक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यांतून यंदाच्या करोडपतीच्या पर्वात सहभागी होणार आहेत.

कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाच्या प्रारंभाविषयी बोलताना सोनी मराठी वाहिनीचे बिसनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले की, कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये कोण होणार करोडपती या रिअ‍ॅलिटी शोची लोकप्रियता आजही टिकून आहे. हु वॉन्ट्स टु बी अ मिलिओनेअर या अमेरिकेत गाजलेल्या शोच्या अनेक आवृत्त्या विविध देशात आपल्याला पहायला मिळतात. मात्र, भारतात हिंदी शोच्या यशवीतेनंतर सर्वप्रथम मराठी भाषेने हा शो सादर करुन त्यामध्ये वैविध्य आणले आहे.

सोनी मराठी वाहिनीचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित फाळके म्हणाले की आता कोण होणार करोडपतीमध्ये नवी लाईफलाईन आम्ही सादर करत आहोत. त्यामध्ये ऑडियन्स पोल, व्हिडीओ कॉल आणि नव्याने फ्लिम द क्वश्चन असे पर्याय असतील. पारितोषिकाची रक्कम तीच असली तरी प्रश्नांमधल्या विविधतेने शो अधिक रंगतदार होईल. शिवाय आठवड्यात सहा दिवस प्रेक्षकांना घरबसल्या ह्या शोच्या माध्यमातून दर्जेदार करमणूक मिळणार आहे.

कोण होणार करोडपतीचे सूत्रसंचालक आणि अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले की, हिंदीमध्ये अमिताभ बच्चनसारख्या कालातीत श्रेष्ठ कलाकाराने अजरामर केलेला शो मराठीमध्ये सातत्याने मला करायला मिळत आहे, हा मी माझा सन्मान समजतो. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असलेल्या विविध स्पर्धकांची सुखदु:खे जाणून घेताना मी अभिनेता म्हणूनही अधिक समृद्ध होत आहे. आता प्रेक्षकांच्या उपस्थितीत समोरासमोर हा अद्भुत खेळ खेळताना येणारा थरार प्रेक्षकांनाही अनुभवता येणार आहे.

[read_also content=”धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्यदिव्य मिरवणुक; शहाजीराजे भोसले यांची उपस्थिती https://www.navarashtra.com/maharashtra/grand-procession-on-the-occasion-of-the-birth-anniversary-of-dharmaveer-chhatrapati-sambhaji-maharaj-presence-of-shahaji-raje-bhosale-nrdm-285650.html”]

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम टीव्हीवर पाहता-पाहता सोनी लिव्ह ॲपवर प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’ आणि जिंकू शकतात भरपूर बक्षिसं आणि हॉटसीटवर येण्याची संधी. पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’. ६ जूनपासून सोम.-शनि., रात्री ९ वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Web Title: Who will be the new millionaire on sony marathi starting from 6th june nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 27, 2022 | 09:00 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • pune news
  • Sachin khedekar

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.