Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Exit Polls Result 2024: महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज

राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात 3771 पुरुष, 363 महिला आणि  तृतीयपंथी 2 उमेदवारांचा समावेश आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 20, 2024 | 04:24 PM
Maharashtra Exit Polls Result 2024: महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून  मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया संपेल. त्यानंतर राज्यभरात कुठे, किती टक्के मतदान झाले, जनतेचा प्रतिसाद का होता. याचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर होतील. राज्यातील गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडी पाहता यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक क्षणाचा कल जाणून घेण्यासाठी जनतेत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेत निवडणुकीचे एक्झिट पोलचे निकाल लोकांना कुठे पाहायला मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा महायुतीकडून  भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट  यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांच्यात निकराची लढाई होत आहे.  भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी महाविकास आघाडीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केल्याचे दिसत आहे. तर महाआघाडीच्या बाजूने वातावरण निर्माण होऊ न देण्यासाठी भाजपनेही आपली ताकद पणाला लावली आहे.  प्रयत्न होता.

मतदारांचा कौल कुणाला? Exit Poll चे अंदाज लवकरच, ओपिनियन पोलपेक्षा किती वेगळे? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात 3771 पुरुष, 363 महिला आणि  तृतीयपंथी 2 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांसाठी  मतदान पूर्ण झाल्यानंतर लगेचच संध्याकाळी 6.30 च्या सुमारास एक्झिट पोलचे निकाल येण्यास सुरुवात होईल.

2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 161 जागा जिंकल्या होत्या. यात भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तर  काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. याशिवाय इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या. यातही छोट्या पक्षांना 16 जागा मिळाल्या. तर 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. पण मुख्यमंत्रीपदावरून मतभेद झाल्याने ऐन सत्तास्थापनेच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती तुटली. भाजपकडे बहूमत नसल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले.

Vinod Tawade News: विनोद तावडेंचा कॅश कांड गेम कुणी केला? 10 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं, फडणवीसांशी संबंध काय?

पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्य मोठी फूट पडली. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात सहा मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले हेत. यावेळी महाविकास आघाडीकडून सर्वाधिक  101 जागांवर  काँग्रेस आणि महायुतीकडून भाजप 149 जागांवर निवडणूक लढवत आहे.

Web Title: Whose government will come in maharashtra what is the prediction of the exit poll nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.