Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रफुल्ल पटेलांच्या खासदारकीची चार वर्षे बाकी असताना का भरला अर्ज? अजित पवार गटाला कसली भीती, वाचा नेमकं कारण…

  • By युवराज भगत
Updated On: Feb 15, 2024 | 03:16 PM
Why did you fill the nomination form when there are four years of MP left? What is the fear of Ajit Pawar group? Praful Patel said because…

Why did you fill the nomination form when there are four years of MP left? What is the fear of Ajit Pawar group? Praful Patel said because…

Follow Us
Close
Follow Us:
NCP Ajit Pawar Group Rajya Sabha Seat : राज्यसभेच्या जागेसाठी सर्वच पक्षांची लगबग सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित केल्यानंतर अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाने राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. पटेल यांनी काही वेळापूर्वी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी (१४ फेब्रुवारी) सायंकाळी पटेल यांचं नाव जाहीर केल्यापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पटेल हे सध्या राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांचा खासदारकीचा चार वर्षांचा कालावधी अद्याप बाकी आहे तरीदेखील पक्षाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी का दिली असा प्रश्न अनेकजण उपस्थित करीत आहेत.
Filed my nomination for the Rajya Sabha elections, representing the Nationalist Congress Party from Maharashtra. It's an honor to have the opportunity to serve the people of Maharashtra and contribute to the legislative process at the national level. I look forward to working… pic.twitter.com/btwNfWNUHn — Praful Patel (@praful_patel) February 15, 2024
आमदार अपात्रतेप्रकरणी अद्यापि निकाल बाकी
दुसरीकडे विरोधकांनी दावा केला आहे की, आमदार अपात्रतेप्रकरणी अद्याप निकाल लागलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच याप्रकरणी निकाल देतील. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला या निकालाबाबत भीती आहे.
शरद पवार गटाकडून अपात्रतेसाठी याचिका दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाने राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला आहे की, “सध्या अजित पवार गटात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेत त्यांनी पुन्हा एकदा पटेल यांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.” जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यावर आता स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार आणि पक्षातील ज्येष्ठांच्या सूचनेनुसार
प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी आमच्या पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या
प्रफुल्ल पटेल म्हणाले, माझी राज्यसभेची टर्म अजून चालू असताना मी परत एका उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे लोक वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. मला त्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की, काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या. आम्ही राजकीय जीवनात काम करत असताना आम्हाला काही ना काही घडामोडी कराव्या लागतात.
काही नेते सध्या आमच्याकडे येण्यासाठी इच्छूक
पटेल म्हणाले, विरोधी पक्षांमधील काही नेते सध्या आमच्याकडे येण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे येणारा काळ तुमच्यासमोरचं चित्र स्पष्ट करेल. तसेच मी आता उमेदवारी अर्ज का भरला तेदेखील स्पष्ट होईल. मला खात्री आहे की, राज्यसभेवर माझी बिनविरोध निवड होणार आहे. त्यामुळे आमची ही रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे. माझी साडेचार वर्षे बाकी असताना पुन्हा उमेदवारी अर्ज का भरला? देशात काही घडलं नाही तरी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही नवीन गोष्टी घडत राहतील.
पटेलांच्या जागेवर दुसऱ्या नेत्याला संधी मिळणार
दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीमुळे त्यांची सध्याची राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे. पटेल आगामी निवडणुकीत जिंकले तर त्यांना आधीच्या जागेवर राजीनामा द्यावा लागेल आणि त्या रिक्त जागेवर अजित पवार गटाकडून दुसऱ्या नेत्याला संधी दिली जाईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Web Title: Why did praful patel fill nomination form when there are four years remaining for mp tenure what is fear of ajit pawar group praful patel give reason nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2024 | 03:12 PM

Topics:  

  • praful patel

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.