Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे रिंगरोडचे काम पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता, भूसंपादनाचे ६० टक्के काम पूर्ण

  • By युवराज भगत
Updated On: Nov 13, 2023 | 06:36 PM
Pune Ring Road Project

Pune Ring Road Project

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शहराभोवती उभारण्यात येणाऱ्या रिंगरोडचे प्रत्यक्ष काम पुढीलवर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. पश्चिम भागातील चौदा गावांतील भूसंपादनाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, या भागातील रस्त्याच्या कामाची निविदा काढण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने प्रक्रीया सुरू केली आहे. डिसेंबर महिन्यात या निविदा काढल्यानंतर पुढील वर्षी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या रिंगरोडला विशेष राज्य महामार्गाचा दर्जा दिला आहे. हा प्रकल्प वेळेत होण्यासाठी रिंगरोडचे पाच टप्पे करण्यात आले आहे. एका बाजूला भूसंपादनाचे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष रिंगरोड तयार करण्याचा आराखडा निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे.

पुणे रिंगरोड 65 किलोमीटर लांबीचा रस्ता

पश्‍चिम रिंगरोड हा केळवडे (ता. भोर) ते उर्से (ता. मावळ) असा सुमारे 65 किलोमीटर लांबीचा असणार आहे. पश्‍चिम भागातील 14 गावांतील सुमारे साठ टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागाचा रिंगरोड विकसित करण्यासाठीची निविदा प्रक्रिया महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. डिसेंबरअखेरपर्यंत निविदा मागवून पुढील वर्षी या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू करण्याचे नियोजन “एमएसआरडीसी’कडून करण्यात आले आहे.

पूर्व आणि पश्‍चिम रिंगरोडचे दोन भाग

रिंगरोडचे पूर्व आणि पश्‍चिम रिंगरोड असे दोन भाग आहेत. पूर्व व पश्‍चिम रिंगरोडची एकूण लांबी 136 कि.मी. असून रुंदी सुमारे 110 मीटर इतकी असणार आहे. आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरुन अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार आहे. त्यामुळे 65 कि.मी. लांबीचा रिंगरोडचे काम लवकर होण्यासाठी पाच टप्पे करण्यात आले असून, एकाच वेळी पाच टप्प्यातील रिंगरोडचे काम सुरू करण्याचा मानस “एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पश्‍चिम रिंगरोडसाठी सुमारे 695 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार असून भूसंपादनासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

*असा असणार रिंगरोडचा मार्ग

पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से (ता. मावळ) येथून सुरुवात परंदवाडी – धामणे – बेबडओहोळ – चांदखेड – पाचाणे (ता.मावळ) – पिंपळोली- केमसेवाडी -जवळ- पडळघरवाडी- रिहे – मातेरेवाडी – घोटावडे – अंबडवेट- भरे – कासारआंबोली – उरावडे – आंबेगाव – मारणेवाडी – मोरेवाडी – भरेकरवाडी – कातवडी (ता. मुळशी) – बहुली- भगतवाडी -सांगरुण – मांडवी बुद्रुक – मालखेड – वरदाडे – खामगाव मावळ – घेरा सिंहगड – मोरदरवाडी – कल्याण – रहाटावडे (ता. हवेली) – रांजे- कुसगाव -खोपी- कांजळे- केळवडे (ता. भोर) येथील पुणे -सातारा महामार्गाला जोडला जाणार आहे.

Web Title: Work on pune ring road likely to start next year 60 percent land development work completed nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2023 | 06:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.