Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मी आमदार अन् महापौर झाल्यानंतर तुमचा जन्म झालाय त्यामुळे………;भुजबळांचा रोहित पवारांना सबुरीचा सल्ला

Chhagan Bhujbal : रोहित पवारांच्या शब्दाला मी किंमत देत नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईल, असा इशाराच यावेळी भुजबळांनी दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी पुढे अनेक घडामोडी घडणार असल्याचे पाहायला मिळाले.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 10, 2023 | 04:15 PM
मी आमदार अन् महापौर झाल्यानंतर तुमचा जन्म झालाय त्यामुळे………;भुजबळांचा रोहित पवारांना सबुरीचा सल्ला
Follow Us
Close
Follow Us:
Chhagan Bhujbal : मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठे केले, मोठे केले, अशा फालतू गोष्टी करू नका, त्यासाठी इतिहास जाणून घ्या, असा सल्ला छगन भुजबळांनी रोहित पवारांना दिला. तसेच, जास्त काही मी त्यांना किंमत देत नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल, असा इशाराच यावेळी भुजबळांनी (Chhagan Bhujbal) रोहित पवारांना दिला.
रोहित पवारांवर जोरदार निशाणा
आज मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) असून आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका, त्यासाठी इतिहास जाणून घ्या, असा सल्ला भुजबळांनी दिला. त्याचबरोबर अजित पवार (Ajit Pawar) आणि तुम्ही पवार घराणे यांनी ठरवून साहेबांचा राजीनामा घ्यायचं ठरवलं, आम्हाला सांगितलं होतं का? असा प्रतिप्रश्नही केला. जास्त काही मी त्यांना किंमत देत नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल, असा इशाराच यावेळी भुजबळांनी रोहित पवारांना दिला.
शरद पवारांची येवल्यात सभा
शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच येवल्यात (Yeola) पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी कुणाचंही नाव न घेता अनेकांवर निशाणा साधला. आता अजित पवार गट उत्तर सभा घेणार का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, लवकरच त्याचे नियोजन केले जाईल. सद्य:स्थितीत इतर आमदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. काही आमदार हे सुरुवातीला पवार यांच्यासोबत होते, ते आता परत येत आहे. सदर आमदारांचे प्रतिज्ञापत्र करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर असून ते फुले वाड्याला भेट देणार आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे आशीर्वाद घेणार आहेत. ते आमच्यासाठी ऊर्जा स्थान असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.
लवकरच उत्तर सभा 
तसेच आठ दिवस होऊनही अद्यापही अद्याप मंत्री मंडळाचे खाते वाटप होत नसल्याची चर्चा आहे. यावर भुजबळ म्हणाले की, एवढं काही काळजी करण्याचे कारण नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील महिनाभरानंतर मंत्र्यांना घेतले. त्यामुळे लवकरच होईल असेही भुजबळ म्हणाले. दरम्यान बडवे या शब्दावरून अनेक जण आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बडवे हा शब्द खोचक असा शब्द नाही. मी पण विचार करत आहे की, का हा वाक्प्रचार आहे. मात्र राजकारणात सतत काही लोकं आजूबाजूला असतात आणि कानाला लागलेले असतात.त्याच्या मागे कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचे छगन भुजबळांनी स्पष्ट केले.

Web Title: You were born after i became mla and mayor so saburis advice to rohit pawar from bhujbal nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2023 | 03:59 PM

Topics:  

  • Minister Chhagan Bhujbal
  • MLA Rohit Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.