मुंबई : ‘बिग बॉस १५'(Big Boss 15) च्या ग्रँड फिनालेचं (Big boss 15 grand finale) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. या स्पर्धेत ‘टॉप ५’पर्यंत शमिता शेट्टी, (Shamita Shetty) करण कुंद्रा,(Karan kundra) प्रतिक सेहजपाल, निशांत भट्ट, (Nishant Bhatt) तेजस्वी प्रकाश (Tejasswi prakash) हे स्पर्धक जाऊन पोहचले आहेत. अत्यंत चुरशीच्या लढतीत सगळे राऊंड पार केल्यानंतर आता सामना अटीतटीचा झाला आहे. कारण बिग बॉसने या स्पर्धकांना आता एक ओपन ऑफर दिली आहे. एकतर १० लाख घेऊन आत्ताच या शोमधून माघार घ्या किंवा बिग बॉसच्या ट्राॅफीसाठी अंतिम फेरीसाठी खेळा. आता स्पर्धक बिगबॉसची ऑफर स्विकारतात? की अंतिम फेरीसाठी खेळण्यास उत्सुकता दाखवून या खेळाची रंगत अधिकच वाढवतात याचीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.