17 years of jodha akbar special screening of hrithik roshan and aishwarya rai film at oscars 2025
हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांचा पीरियड ड्रामा असलेला ‘जोधा अकबर’ चित्रपट चाहत्यांना प्रचंड आवडला होता. हा चित्रपट रिलीज होऊन १७ वर्षे झाली आहेत. इतकी वर्षे होऊनही या चित्रपटाबद्दलची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. आता या चित्रपटाबाबत ऑस्करकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हृतिक-ऐश्वर्याच्या जोडीला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले.
चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्ष झाल्यानिमित्त ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड साइंसेज’कडून मार्च २०२५ मध्ये स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करणार आले आहे.
‘काला चष्मा जचदा ए…’ रूपाची राणी म्हणजे तूच! पहा, परिनितीचे निखळ सौंदर्य
आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ चित्रपट मुगल सम्राट अकबर आणि राजपूत राजकुमार जोधाबाई यांच्या लव्ह स्टोरीवर आधारित आहे. ह्या ऐतिहासिक रोमँटिक चित्रपटामध्ये हृतिक रोशनने मुगल सम्राट अकबरची भूमिका साकारली होती, तर ऐश्वर्या रायने राजपूत राजकुमार जोधाबाईची भूमिका साकारली होती. १५ फेब्रुवारी रोजी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘जोधा अकबर’ चित्रपटाचा वारसा जिवंत ठेवण्यासाठी, अकादमीने मार्च २०२५ मध्ये अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जोधा अकबर’चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी संपूर्ण हा क्षण एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नाही.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी सांगितले की, ” ‘जोधा अकबर’ चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी प्रेक्षकांचे आभारी आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला त्यांच्या आठवणीत ठेवलं आणि त्यावर निस्सिम प्रेम केलं. चित्रपटाचा प्रवास, त्याच्या प्रदर्शनापासून अकादमी पुरस्कारात विशेष स्क्रीनिंगचा सन्मान, त्याचं कारण चित्रपटात असलेल्या सगळ्यांनी केलेल्या अप्रतिम कामामुळे शक्य झालं आहे. जोधा अकबरला मिळालेले प्रेम पाहून सगळ्यांना नक्कीच आनंद झाला असणार. या चित्रपटाला जगभरातून मिळणाऱ्या प्रेमाला पाहून खूप आनंदीत झालो आहे.’ २००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘जोधा अकबर’ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत हृतिक आणि ऐश्वर्या आहे. त्या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री आणि आशुतोष गोवारिकर यांच्या या चित्रपटाला कोणीही विसरलेलं नाही.
काही दिवसांपूर्वी ‘जोधा अकबर’ चित्रपटाबद्दल बातमी आली होती की, अकादमीनं नुकताच प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर नीता लुल्ला यांच्या शोमध्ये याच चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या लग्नातील लेहेंगा मोशन प्रदर्शनासाठी ठेवला होता. जागतिक प्रेक्षकांवर चित्रपटाचा कायमस्वरूपी प्रभाव साजरा करण्यासाठी मार्च २०२५ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं आहे. ‘जोधा अकबर’ फक्त त्याच्या भव्य दिव्य सेटसाठीच नाही तर त्याच्या अप्रतिम अशा सिनेमेटोग्राफी, कॉस्ट्यूम आणि लक्षवेधी अशा साउंडट्रॅकसाठीही ओळखला जातो. चित्रपटात हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबतच सोनू सूद, रझा मुराद, इला अरुण, निकितिन धीर, सुहासिनी मुळेसह इतर कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.