फोटो सौजन्य: शुभंकर एकबोटे इन्स्टाग्राम
छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट (Chhaava Movie) 14 फेब्रुवारी देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘छावा’ चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहात तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही, त्यांना आता प्रचंड उत्सुकता लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या ह्या चित्रपटामध्ये फक्त बॉलिवूड कलाकाराच नाही तर, अनेक मराठी फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.
देवबागच्या समुद्रकिनारी रंगला Ankita Walawalkar- Kunal Bhagat चा संगीत सोहळा; पाहा Photos
‘छावा’ चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशल, रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्नासह संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, शुभंकर एकबोटे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, नीलकांती पाटेकर या मराठी कलाकारांनीही आपल्या भूमिका उत्तमप्रकारे साकारल्या आहेत. अशातच अभिनेता शुभंकर एकबोटेने एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्याने ‘छावा’ चित्रपटात सरसेनापती धनाजी जाधव यांची भूमिका साकारली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘छावा’च्या संपूर्ण टीमसोबतच विकी कौशलबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
अक्षयची उष्टी हळद दिव्याला लागली, ‘लक्ष्मी निवास’ फेम जान्हवीच्या हळदीतले पाहा खास क्षण
शेअर केलेल्या पोस्टमध्ये शुभंकर एकबोटे म्हणतो,
“सेटपासून मोठ्या पडद्यापर्यंत – ‘छावा’ जगभरात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे! या संपूर्ण प्रवासाचा मला एक भाग होता आलं याचा मला प्रचंड अभिमान आहे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक क्षणाला अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल आणि दाखवलेल्या विश्वासाबद्दल लक्ष्मण उतेकर सर तुमचे खूप खूप आभार… २०१४ मध्ये मी ‘मसान’ पाहिला होता तेव्हापासून प्रतिभाशाली आणि पॉवर हाऊस असलेल्या विकी कौशलबरोबर काम करण्याची संधी मिळावी यासाठी मॅनिफेस्ट केलं होतं आणि ती इच्छा या निमित्ताने पूर्ण झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकी कौशल ‘आमचे राजे…’ माणूस म्हणूनही तो तेवढाच चांगला आहे. राजे तुमच्याबरोबर काम केल्याचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. मानाचा मुजरा राजे…आणि मला तुमच्याबरोबर पुन्हा-पुन्हा स्क्रीन शेअर करायला कायमच आवडेल. ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा सर, प्रदीप सर, विनीत भाई, संतोष दादा ज्यांना मी लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो…त्यांच्याबरोबर आयुष्यभराचे अविस्मरणीय क्षण शेअर करण्याची संधी मिळाली याबद्दल मी त्यांचे पुरेसे आभार देखील मानू शकत नाही. भार्गव शेलार सर आणि परवेज शेख सरांच्या संपूर्ण टीमने मला पडद्यावर लढण्यास सक्षम बनवलं यासाठी त्यांचे मनापासून आभार…माझे मित्र अंकित, आशिष, बालाजी सर, सारंग भाऊ, सुव्रत अशा चांगल्या लोकांचा सहवास या शूटिंगदरम्यान लाभला यासाठी मी आभारी आहे. दिनेश विजन सर, मॅडडॉक फिल्म्स आणि संपूर्ण छावा टीमचे मनापासून आभार…या टीमचा भाग होऊन मी धन्य झालो…’छावा’मध्ये ‘सरसेनापती धनाजी जाधव’ यांची भूमिका साकारण्याची मला संधी दिली हे माझं भाग्यच आहे. मराठ्यांची गर्जना अनुभवण्यासाठी आणि आपल्या महाराजांच्या बलिदानाची, त्यांच्या अविस्मरणीय धाडसाची कहाणी पाहण्यासाठी कृपया चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहा…हर हर महादेव!”
अशी पोस्ट लिहित शुभंकरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून आणि अनेक सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
गायक अवधूत गांधींच्या ‘स्वामी’ गाण्याची सोशल मीडियावर तुफान क्रेझ, महिन्याभरातच घेतली मोठी झेप