लॉस एंजेलिस : अमेरिकेतील लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे ३१ जानेवारी रोजी होणारा ६४ वा ग्रॅमी अवॉर्ड्स (Grammy Awards Postponed) सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर असे पाऊल उचलण्यात आले आहे. पुढची परिस्थिती लक्षात घेऊन कार्यक्रमाची तारीख नंतर ठरवण्यात येईल.
‘द रेकॉर्डिंग अकादमी’ने या प्रकरणाबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यानुसार, ओमायक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता ३१ जानेवारीला हा सोहळा आयोजित करण्यात मोठा धोका आहे. शहर आणि राज्य अधिकारी, आरोग्य आणि सुरक्षा तज्ञ, कलाकार समुदाय आणि आमच्या अनेक भागीदारांशी झालेल्या चर्चेनंतर, रेकॉर्डिंग अकादमी आणि सीबीएसने ६४ वा ग्रॅमी अवॉर्ड शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही संगीताची आतापर्यंतची सर्वात मोठी रात्र साजरी करण्यास उत्सुक आहोत. या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.’
After careful consideration and analysis with city and state officials, health and safety experts, the artist community and our many partners, we have postponed the 64th #GRAMMYs. https://t.co/oMzV1U9Tsc — Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) January 5, 2022
गेल्या वर्षीही कोरोनामुळे हा सोहळा १४ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. ग्रॅमी पुरस्कार हा सर्वात मोठा वार्षिक संगीत पुरस्कार सोहळा आहे. दरवर्षी या पुरस्कार वितरणाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये नामवंत कलाकारांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे सन्मानित केले जाते.
[read_also content=”केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण, ट्विटद्वारे दिली माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/central-state-minister-bharati-pawar-found-corona-positive-nrsr-218858/”]
२०२१ च्या सुरुवातीच्या मोठ्या पुरस्कारांप्रमाणे, कोरोना व्हायरसमुळे ग्रॅमी पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वर्षी, कॉन्सर्ट स्टेपल्स सेंटरऐवजी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोकळ्या मैदानी सेटवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. इतकेच नाही तर सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन वेगवेगळे स्टेज तयार करण्यात आले आणि सेलिब्रिटींच्या बसण्याची जागाही बदलण्यात आली.याशिवाय प्रेक्षकांची आसनक्षमताही कमी झाली होती.






