Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या अडचीण पुन्हा वाढ! कोर्टाने बजावली समन्स, ‘आरोपी क्रमांक 11’ दिले नाव

‘पुष्पा 2’च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने त्यांना २२ जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 19, 2026 | 02:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. या प्रकरणी हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुन यांना समन्स बजावून २२ जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या सुनावणीसाठी त्यांच्यासह इतर १९ आरोपींनाही न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

Raja Shivaji: ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे ५० यशस्वी दिवस पूर्ण, रचला नवा इतिहास!

तपासादरम्यान चिक्कडपल्ली पोलिसांनी अल्लू अर्जुन यांना या प्रकरणात आरोपी क्रमांक ११ (A11) म्हणून नमूद केले आहे. तर संध्या थिएटरच्या व्यवस्थापनाला आरोपी क्रमांक १ ते १० (A1–A10) म्हणून दाखल करण्यात आले आहे. ‘पुष्पा 2’च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार गर्दी नियंत्रणात झालेल्या कथित निष्काळजीपणाची चौकशी सुरू आहे.

४ डिसेंबर २०२४ रोजी ‘पुष्पा 2: द रूल’च्या प्रीमियर शोवेळी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली होती. अल्लू अर्जुन थिएटरमध्ये पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी हजारो चाहते एकत्र जमल्याने प्रचंड गर्दी झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. या दुर्घटनेत ३५ वर्षीय रेवती यांचा गुदमरल्याने मृत्यू झाला, तर त्यांचा लहानग्याला गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेता येणार असल्याची पूर्वकल्पना ना थिएटर व्यवस्थापनाने दिली होती, ना संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन, त्यांच्या सुरक्षा पथकातील सदस्य आणि संध्या थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांखाली निष्काळजीपणा आणि अपुऱ्या गर्दी व्यवस्थापनाचे आरोप ठेवून गुन्हा नोंदवला.

१३ डिसेंबर २०२४ रोजी या प्रकरणात अल्लू अर्जुन यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. नंतर हैदराबाद पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले. या घटनेनंतर अल्लू अर्जुन यांनी रेवती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची घोषणाही केली होती.

Sun Marathi Serial: ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये शनायाच्या भूमिकेत ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री; अनुप्रियाच्या संसारात येणार मोठं वादळ

दरम्यान, कामाच्या आघाडीवर अल्लू अर्जुन लवकरच दिग्दर्शक अ‍ॅटली यांच्या ‘राका’ या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार असून रश्मिका मंदाना, मृणाल ठाकूर आणि जान्हवी कपूर यांच्या सहभागाबाबतही चर्चा आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Web Title: A hyderabad court has issued summons to allu arjun in connection with the death of a pushpa 2 fan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Hyderabad
  • Hyderabad Crime

संबंधित बातम्या

Hyderabad Crime: YouTube वर पाहिल्या मृत्यूच्या पद्धती; हेलियम गॅस मागवून CA ने लॉजमध्ये संपवलं आयुष्य, कारण समोर
1

Hyderabad Crime: YouTube वर पाहिल्या मृत्यूच्या पद्धती; हेलियम गॅस मागवून CA ने लॉजमध्ये संपवलं आयुष्य, कारण समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.