शेवटी तो बापच… आमिर खानने लेक जुनैदचा 'लव्हयापा' चित्रपट सुपरहिट होण्यासाठी केला नवस
जुनैद खानचा येत्या ७ फेब्रुवारीला ‘लव्हयापा’ चित्रपट रिलीज होणार आहेत. तिच्यासोबत चित्रपटामध्ये श्रीदेवीची लेक खुशी कपूरही दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी फँटम स्टुडिओने या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर चित्रपटातलं निर्मात्यांनी पहिलं गाणंही रिलीज केलं होतं. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती चित्रपटाची… चित्रपट रिलीज होण्यापूर्वी जुनैद खानसाठी अभिनेता आमिर खानने एक नवस केला आहे. लेकाचा चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी आमिर व्यसनातील एक गोष्ट सोडणार आहे.
फ्लॅट रंगविण्यासाठी आला अन् चुना लावून गेला, अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या घरी लाखोंची चोरी
एका मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खानने मुलाचा ‘लव्हयापा’ चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी एक नवस केला आहे. जर, जुनैद खानचा ‘लव्हयापा’ चित्रपट सुपरहिट झाला. तर आमिर खान आयुष्यात स्मोकिंग करणं अर्थात धुम्रपान करणं कायमचं सोडणार आहे. लेकासाठी आमिरच्या या निःस्वार्थी प्रेमाचं सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगलंच जोरदार कौतुक केलं जातंय. त्यामुळे जुनैदचा ‘लव्हयापा’ पहिला चित्रपट थिएटरमध्ये कसा चालणार ? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे.
‘लव्हयापा’मध्ये रोमान्ससोबतच कॉमेडीचा टचही पाहायला मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह टुडे’ या तमिळ भाषेतील चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. ‘लव्ह टुडे’ या तमिळ भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत प्रदीप रंगनाथन आणि रवीना रवी दिसले होते. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रदीप रंगनाथननेच केलं होतं. ‘लव्हयापा’ हा सिनेमा हा मॉडर्न युगातील प्रेमकहाणीवर आधारित असेल. मनाला भिडणारं कथानक, उत्कृष्ट अभिनय आणि मजेदार संगीत या सर्व गोष्टीने परिपूर्ण असणारा हा चित्रपट आहे.
“बाहेर पडणं गरजेचं असतं…” तेजश्री प्रधान असं का म्हणाली ?
दरम्यान, जुनैद आणि खुशीचा पहिल्याच थिएट्रिकल चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार असून ‘लव्हयापा’ असं चित्रपटाचं नाव आहे. फँटम स्टुडिओ आणि झी स्टुडिओजने एकत्रित या चित्रपटाची निर्मिती केली आहे. खुशी कपूर आणि जुनैद खान हे दोघंही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्रित दिसणार आहे. जुनैद खानने ‘महाराज’ चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. तर, खुशी कपूरने झोया अख्तरच्या ‘द आर्चिस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मुख्य बाब म्हणजे, जुनैद आणि खुशीचा हा थिएट्रिकल पहिला चित्रपट असणार आहे. दोघांचाही करियरमधला पहिला चित्रपट ओटीटीवरीलच होता. आता त्यामुळे त्यांच्या थिएटरवरील चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
Ghada Ghada Bolaicha: मनात नाही ठेवायचं ‘घडा घडा बोलायचं’ म्युझिकल चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस!