अभिनेता अमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपट प्रदर्शानाआधीपासूनच सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. काही जण चित्रपटाला ट्रोल करत आहेत तर काही जण चित्रपटाचं समर्थनही करताना दिसत आहे. नुकतचं गायक राहुल देशपांडे यांनी लाल सिंह चड्ढा समर्थन केलं होतं यावरून नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं होतं. आता असाच काहीसा प्रकार अभिनेता हृतिक रोशन झाला आहे. यामध्ये अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) या चित्रपटाचे समर्थन केले आहे, ज्यामुळे तो ट्रोल होऊ लागला आहे.
[read_also content=”गुगल कडून भारताच्या स्वातंत्रोत्सवानिमित्त खास डुडल ! https://www.navarashtra.com/india/indias-75th-independence-day-special-doodle-from-google-316180.html”]
आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला सुरुवातीपासून सोशल मीडियातून प्रचंड विरोध होत आहे. बॅालिवूडचे अनेक स्टार्स आता लाल सिंह चड्ढाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचे चित्र बघायला मिळते आहे. यामध्ये अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) या चित्रपटाचे समर्थन केले आहे, ज्यामुळे तो ट्रोल देखील होऊ लागला आहे. आमिरच्या चित्रपटाला हृतिक रोशनला सपोर्ट करताना पाहून लोक त्याच्यावर नाराज झाले आहेत. ज्याचा परिणाम आता त्याच्या आगामी चित्रपट (Movie) विक्रम वेधावर होऊ शकतो. कारण आता लोकांनी त्याच्या विक्रम वेधा या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केलीयं. यामुळे आमिर खानच्या चित्रपटाला समर्थ करण्याच्या नादामध्ये हृतिक रोशनने स्वत: च्या समस्यांमध्ये मोठी वाढ करून घेतल्याचे बोलले जात आहे.
[read_also content=”स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लाल किल्ल्यावरून महिला शक्तीचा जागर! https://www.navarashtra.com/india/awakening-of-womens-power-from-red-fort-in-the-nectar-festival-of-freedom-nrps-316172.html”]