Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 5 : “माफी माग, ते तुला नक्की…”, आर्याच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

बिग बॉसच्या घरात सातव्या आठवड्यात निक्की आणि आर्याचं कडाक्याचं भांडण झालं. त्यांच्या वादाने अख्खा आठवडा चर्चेत राहिला. आजच्या भाऊच्या धक्कावर बिग बॉस तिला काय शिक्षा देणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण असं असलं तरीही अख्खा महाराष्ट्र आर्याच्या बाजुने उभा राहिला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Sep 14, 2024 | 03:16 PM
"माफी माग, ते तुला नक्की...", आर्याच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

"माफी माग, ते तुला नक्की...", आर्याच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉसच्या घरात सातव्या आठवड्यात निक्की आणि आर्याचं कडाक्याचं भांडण झालं. त्यांच्या वादाने अख्खा आठवडा चर्चेत राहिला. आज म्हणजेच शनिवारी सातव्या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ आहे. आजच्या भाऊच्या धक्कावर बिग बॉस तिला काय शिक्षा देणार ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण असं असलं तरीही अख्खा महाराष्ट्र आर्याच्या बाजुने उभा राहिला आहे. तिच्या समर्थनार्थ अख्खा महाराष्ट्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतोय. शिवाय इंडस्ट्रीतीलही अनेक कलाकार तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

हे देखील वाचा – “प्रलय पुन्हा येणार”! तुंबाडच्या यशानंतर 6 वर्षांने ‘तुंबाड २’ ची राही अनिलने केली घोषणा!

प्रसिद्ध बिग बॉस फेम अभिनेता अभिजित केळकर ह्याने एक इन्स्टा पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिजितने आर्याचे कौतुक केले असून बिग बॉसची माफी माग ते तुला पुन्हा नवीन संधी देतील, असं सांगितलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता म्हणतो, “…आर्या, तुझं नडणं, तुझं भिडणं, एकटीनं खेळणं, सगळं आवडत होतं पण…हा खेळ संयमाचाही आहे, मानसिक संतुलनाचाही आहे. हिंसेचं समर्थन नाहीच करता येणार… पण माफी माग. तू जेन्यून (खरी) आहेस, ते तुला नक्की एक संधी देतील…”, अशी पोस्ट अभिजीतने केली आहे.

“माफी माग, ते तुला नक्की…”, आर्याच्या समर्थनार्थ प्रसिद्ध बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

गुरूवारी झालेल्या एपिसोडमध्ये, निक्की आणि आर्यामध्ये कॅप्टन्सी टास्क दरम्यान वॉशरूम एरियामध्ये काही कारणास्तव वाद झाला. त्यांचा हा वाद इतका टोकाला गेला की, आर्याने रागाच्या भरात थेट कानाखालीच दिली. निक्की ‘जादुई हिरा’ घ्यायला येईल म्हणू बाथरूमचा दरवाजा लावून घेतला होता. निक्कीच्या म्हणण्याप्रमाणे अरबाजने दरवाजा जोरात ढकलत निक्की वॉशरुममध्ये आली. मागोमाग जान्हवीसुद्धा हिऱ्याचं रक्षण करण्यासाठी आत आली.

याचदरम्यान आर्या- निक्कीमध्ये मोठी झटापट होऊन वाद झाले. त्यामुळे भडकलेल्या आर्याने निक्कीच्या थेट कानाशिलातच वाजवली यानंतर निक्की रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन जोरजोरात आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना सांगत होती. घटना घडल्यानंतर बिग बॉसच्या समोर आर्या स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाली की, “दरवाजा उघडल्यावर निक्की आत आली. तिला मी बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी तिचा हात माझ्या डोळ्याखाली लागला आणि या झटापटीत मी तिला मारलं.”

हे देखील वाचा- शाहरुखच्या ‘किंग’ला ‘लव्ह अँड वॉर’ देणार टक्कर, चित्रपटाची रिलीज डेट झाली जाहीर!

दरम्यान, या प्रकरणावर सध्या सोशल मीडियावरून आर्याला चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर आर्याला बिग बॉस काय शिक्षा सुनावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Actor abhijeet kelkar shared post after aarya slapped nikki tamboli in bigg boss marathi 5 house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 03:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.